वसई : धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढत असताना एका वृद्ध प्रवाशांचा पाय घसरल्यामुळे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्यामध्ये अडकले. मात्र त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे पोलिसाने सतर्कता दाखवत वृद्ध प्रवाशाला खेचून बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचवले. ही घटना स्थानकात लागल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.नालासोपारा येथे राहणारे विजय वसंतराव मळेकर हे ७६ वर्षीय वृद्ध वसई रोड रेल्वे स्थानकात लोकल ट्रेन पकडण्यासाठी आले होते. बुधवार रात्री ११ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास विरारला जाणारी जलद लोकल वसई रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आली. त्यानंतर ही लोकल रवाना होत असताना विजय मळेकर यांनी धावत्या लोकलमध्ये चढून लोकल पकडण्याचा प्रयत्न केला.

मन सुन्न करणारी घटना! पत्नीने आत्महत्या केल्याचे पतीने केले जाहीर, मात्र पोलीस चौकशीत धक्कादायक सत्य उघड
रेल्वे पोलिसाने दाखवली समयसूचकता

धावत्या लोकलचा वेग वाढल्याने विजय मळेकर यांचा पाय घसरला आणि ते रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या पोकळीत खाली पडत असतानाच त्याठिकाणी असलेल्या लोहमार्ग पोलिस कॉन्स्टेबल यांनी समयसूचकता दाखवली. प्रवासांच्या मदतीने रेल्वे प्लॅटफॉर्म आणि पोकळीत पडत असलेल्या प्रवाशाला खेचून बाजूला सारले व मळेकर यांचे प्राण वाचवले. रेल्वे स्थानकात घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पुण्यात एसटीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी उलटली, एकाचा मृत्यू
रेल्वे पोलिसाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचले आहेत, यामुळे रेल्वे पोलिसांचे कौतुक होत आहे. विजय माळेकर यांना त्यानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले, आपल्या घरातील व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल मळेकर कुटुंबीयांनी देखील पोलिसांचे आभार मानले आहेत.

धक्कादायक! पती-पत्नीचा घरगुती वाद टोकाला; पतीने रागाच्या भरात पत्नीचा कानच उपटून काढला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here