मुंबई : एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झालेली असताना एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महानगर गॅसकडून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार सीएनजीच्या दरात प्रतिकिलो ८ रुपयांची कपात केली आहे. या बरोबरच स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या पीएनजी गॅसच्या दरातही ५ रुपये प्रति एससीएमची कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून, म्हणजेच ८ एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार आहेत.केंद्र सरकारने गॅस दराबाबत पारेख समितीच्या शिफारसी स्विकारल्यानंतर ही दर कपात लागू करण्यात आली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी प्रमुख सीएनजी, पीएनजी गॅस वितरक कंपनी आहे. त्यामुळे सीएनजी गॅसच्या दर कपातीचा मोठा फायदा कार चालकांपासून ते रिक्षा चालकांनादेखील होणार आहे. या दरकपातीमुळे सर्वच स्तरातील लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

पाहा थरारक VIDEO; धावती ट्रेन पकडताना घसरला पाय; रेल्वे पोलिसाने वाचवले वृद्धाचे प्राण
मुंबईत किती असेल सीएनजी पीएनजीचा नवा दर?

महानगर गॅसच्या या निर्णयामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरात सीएनजीच्या किंमती कमी होत आहेत. आज मध्यरात्रीपासून, म्हणजेज ८ एप्रिलपासून महानगर गॅस लिमिटेडकडून वितरीत होणाऱ्या सीएनजीचा दर प्रति किलो ७९ रुपये इतका असेल. तर, पीएनजीचा दर ४९ रुपये प्रति एससीएम इतका असणार आहे.
मन सुन्न करणारी घटना! पत्नीने आत्महत्या केल्याचे पतीने केले जाहीर, मात्र पोलीस चौकशीत धक्कादायक सत्य उघड
केंद्र सरकारने जाहीर केले सीएनजीचे दर

पारेख समितीच्या शिफारसी स्विकारल्यानंतर केंद्र सरकारने आज सीएनजी गॅसचे दर जाहीर केले आहेत. एप्रिल महिन्यासाठी ७.९२ डॉलर प्रति MMBtu इतकी निश्चित करण्यात आली आहे. ग्राहकांसाठी हे दर ६.५ डॉलर इतके असतील.

पुण्यात एसटीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी उलटली, एकाचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here