मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सुनेने चार आरोपी महिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चार महिलांना ताब्यात घेतले.
सुनेने तक्रारीत म्हटले आहे की, तिची सासू दाराजवळ उभी होती. यावेळी शेजारी राहणारी शीतल नामक महिला हातात पाणीपुरी घेऊन जात होती. शीतलने वृद्धेला पाणीपुरी खाण्यास सांगितले असता तिने नकार दिला. या गोष्टीने शीतलला खूप राग आला आणि यावरुन दोघींमध्ये मोठा वाद झाला. काही वेळाने शीतलची आई आणि दोघी वहिनीही घटनास्थळी आल्या. चौघींनी मिळून तिच्या सासूला बेदम मारहाण सुरू केली आणि ती खाली पडली. पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना रुग्णालयात नेले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
अकोलेकरांना गारवा देणारी फेमस डिश; खिसलेला बर्फ अन् आइस्क्रीम भरलेली पाणीपुरी
दुसरीकडे, पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, ही घटना गल्ली क्रमांक-७, खेडा गाव, जीटीबी एन्क्लेव्ह भागात घडली आहे. मयत शकुंतला देवी तिच्या कुटुंबासह राहत होती. आरोपी महिला शीतल कुटुंबासोबत तिच्या शेजारी राहते. शेजाऱ्यांनी आपल्या सासूची हत्या केल्याचा आरोप शकुंतला यांच्या सुनेने केला आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून शीतल, मधु, मीनाक्षी आणि शालू यांना ताब्यात घेतले.