मुंबई : देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत केंद्र सरकार आणि महानगर गॅसनंतर अदानी समूहाने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी केल्या आहेत. देशातील नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्यासाठी २०१४ च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणेला मंजुरी दिल्यानंतर आता कंपन्यांनी सीएनजी-पीएनजीच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. या दिशेने पाऊल टाकत अदानी टोटल गॅस लिमिटेडने प्रथम गॅसच्या किमती कमी केल्या आणि ८ एप्रिलपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. लवकरच आणखी अनेक कंपन्याही या दिशेने निर्णय घेऊ शकतात, अशी अपेक्षा आहे.

अदानी गॅसचे नवीन दर

अदानी टोटल गॅस लिमिटेडने (ATGL) सीएनजीची किंमत प्रति किलो ८.१३ रुपये तर पीएनजीचा भाव ५.०६ रुपये प्रति घन सेंटीमीटरने कमी केला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ८ एप्रिलच्या मध्यरात्री १२ पासून नवीन किमती लागू झाल्या आहेत. एटीजीएलचा हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घरगुती गॅसच्या किमतीसाठी नवीन फॉर्म्युला लागू केल्याच्या काही तासांनी जाहीर करण्यात आला.

यापूर्वी सरकारचे म्हणणे आहे की नवीन फॉर्म्युला सीएनजी आणि पीएनजीच्या किमती सुमारे १०% पर्यंत कमी करेल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी सांगितले की घरगुती गॅसच्या किमती आता आंतरराष्ट्रीय हब गॅसऐवजी आयातित क्रूडशी जोडल्या गेल्या असून आता घरगुती गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या किमतीच्या १०% असेल. एवढेच नाही तर आता सीएनजी आणि पीएनजीची दर महिन्याला किंमत निश्चित केली जाणार आहे. तर, पहिल्या वर्षी दर सहा महिन्यांनी दोनदा दर निश्चित करण्यात आले होते.

CNG and PNG Price: गुड न्यूज! सीएनजी-पीएनजीच्या दरात मोठी कपात, पाहा काय आहेत नवे दर
पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणले की, घरगुती गॅसच्या किमतीची कमाल आणि कमाल मर्यादा दोन वर्षांसाठी निश्चित केली जाते. यानंतर ते $०.२५ ने वाढवले जाईल. सध्या भारतीय क्रूड बास्केटची किंमत प्रति बॅरल ८५ डॉलर असून यातील १०% प्रति बॅरल $८.५ झाले. पण सरकारने त्याची कमाल मर्यादा $६.५ ठेवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार आहेत.

Milk Price: जोर का झटका! सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार, दुधाचे दर आणखी वाढण्याची शक्यता
गॅसच्या किमतींबाबत नवीन फॉर्म्युला लागू
आत्तापर्यंत देशांतर्गत नैसर्गिक वायूची किंमत जगातील चार प्रमुख गॅस व्यापार केंद्रे – हेन्री हब, अल्बेना, नॅशनल बॅलन्सिंग पॉइंट (यूके) आणि रशियन गॅसच्या किमतीच्या आधारे निश्चित केली जात होते. किमती निश्चित करण्यासाठी जुन्या फॉर्म्युल्यानुसार चारही गॅस ट्रेडिंग केंद्रांच्या मागील एका वर्षाच्या किमतीची सरासरी मोजली जाते आणि नंतर ती तीन महिन्यांच्या अंतराने लागू केली जाते.

आंतरराष्ट्रीय बाजारात भावात चढ-उतार होत असतो, आणि त्याचा परिणाम गॅसच्या किमतीवर दिसून येतो. मात्र, आता नवीन सूत्रानुसार, गेल्या एक महिन्यातील भारतीय क्रूड बास्केटची किंमत घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतीचा आधार म्हणून घेतली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here