आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरू असतानाही २१ मे २०२२ नंतर राष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर काही काळापासून किमतीत वाढ दिसून येत आहे, जी आजही कायम आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता सुधारित केले जातात. देशभरात सकाळी ६ वाजल्यापासून वाहन इंधनाचे नवीन दर लागू होतात. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. या मानकांच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज निश्चित केले जातात. डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवणारे स्वत: या किमतींवर कर आणि स्वतःचे मार्जिन जोडून किरकोळ किमतीत पेट्रोल विकतात. म्हणून सर्वसामान्यांना अधिक पैसा देऊन वाहन इंधन खरेदी करावे लागते.
क्रूड ऑइलचा आजचा भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव पुन्हा एकदा ८० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. WTI क्रूड ऑइल ०.११% वाढीसह ८०.७० प्रति बॅरलवर पोहोचले असताना ब्रेंट क्रूड ऑइल ०.१५ टक्क्यांनी वाढून ८५.१२ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. या वाढीनंतरही आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर एकतर स्थिर आहेत किंवा त्यात किंचित बदल झाला आहे.
तुमच्या शहरातील भाव असा चेक करा!
वाहन चालक घराबाहेर न पडता एक SMS पाठवूनही त्यांच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तपासू शकतात. इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी त्यांच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ वर पाठवावा तर HPCL ग्राहकांनी ९२२२२०११२२ वर HPPRICE <डीलर कोड> आणि BPCL ग्राहकांनी RSP<डीलर कोड> ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवावा.
शिंदे-फडणवीस सरकारनं घेतलेला निर्णय म्हणजे अपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय – अमोल मिटकरी