पालघरः कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार वडील व त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अंबाडी- वज्रेश्वरी मार्गावर अपघात घडला असून या अपघातात पत्नी व दहा वर्षाचा मुलगा असे दोघे देखील जखमी झाले आहेत. अल्पेश वसंत पाटील (वय ३५) व ईशान (वय ३) असे अपघातात मृत वडील व त्यांच्या चिमुकल्याचे नाव आहे.पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पिक गावातील रहिवासी असून सध्या अंबाडी येथे राहत असलेले अल्पेश वसंत पाटील (वय ३५) हे आपल्या दुचाकीवरून पत्नी व दोन मुलांसोबत एका साखरपुड्याच्या समारंभासाठी वज्रेश्वरी येथे जात होते. अंबाडी- वज्रेश्वरी मार्गावर समोरुन येणाऱ्या भरधाव कारने अल्पेश पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अल्पेश पाटील व त्यांच्या तीन वर्षाचा चिमुकला मुलगा ईशान याचा जागीच मृत्यू झाला असून शुक्रवारी साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मोठी बातमी! अनाथ मुलांना नोकरी, शिक्षणामध्ये १ टक्के आरक्षण, महाराष्ट्र सरकारचा निर्णय
कार व दुचाकीच्या या अपघातात दुचाकीस्वार अल्पेश यांची पत्नी व दहा वर्षाचा मुलगा हे देखील जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वडील व त्यांच्या चिमुकल्या मुलाचा अपघातात असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वादळी पावसाने घराची भिंत कोसळली, दोन चिमुकल्या आतच अडकल्या, एकीचा जागीच मृत्यू, तर दुसरी…

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, शिवसेना महिला कार्यकर्त्यांवर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here