नंदुरबार : दुर्गम भागातल्या थुवाणी येथे सोलर बॅटरीच्या केबलने पेट घेतल्याने एका गरीब कुटुंबाचं कौलारू घर जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत रोख रक्कम दागिन्यांसह धान्य तसेच जीवनाशक वस्तू जळून खाक झाले आहे. संपूर्ण घर जळून खाक झाल्याने थुवानी येथील हे गरीब कुटुंब उघड्यावर आलं आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील थुवाणी येथे सोलर बॅटरीच्या केबलने पेट घेतल्याने कौलारू घर जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. उन्हामुळे ही केबल तापली आणि या केबलने पेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. थुवाणी येथील करश्या नाऱ्या पाडवी यांच्या घरात ही आग लागली. आगीत करश्या पाडवी यांच्या घरातील बांधकामासाठी गोळा करून ठेवलेले दीड ते दोन लाख रुपयांसह दागिने, घरातील धान्य, जीवनावश्यक वस्तू आणि घरातील साहित्य जळून खाक झाले.
अदानी प्रकरणात JPC चौकशीला विरोध नाही, पण… शरद पवारांची जाहीर भूमिका
आगीच्या या घटनेनंतर करश्या पाडवी यांचे कुटुंब उघड्यावर आलं आहे. आगीची घटना घडली त्यावेळी करश्या पाडवी यांच्या पत्नी पिजारीबाई ह्या घरात एकट्या होत्या. मुले बाहेर खेळत असल्याने त्यांना अचानक आगीचा लोळ उठल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती आई पिजारीबाई यांना कळवली. पिजारीबाई ह्या तातडीने घराबाहेर पडल्या आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण लाकडी घर जळून खाक झाले. करश्या पाडवी यांना शासनाने भरपाई द्यावी, अश‍ी मागणी आता होत आहे.

मोठी बातमी! अनाथ मुलांना नोकरी, शिक्षणामध्ये १ टक्के आरक्षण, महाराष्ट्र सरकारचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here