नवी दिल्ली : उन्हाळा सुरु झाला असून दिवसेंदिवस तापमानातही वाढ जाणवत आहे. उन्हाची चाहूल लागली की लोक थंड पदार्थांकडे वळतात. आणि हा व्यवसाय तुम्हाला मोठी कमाई देखील करू शकतो. अशा स्थितीत जर तुम्हाला उन्हाळ्यात कमी बजेटमध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आइस क्यूब फॅक्टरीमधून चांगली कमाई करू शकता. तुम्ही उन्हाळ्यात आइस क्यूब फॅक्टरी सुरू करू शकता आणि मोठी मागणी असलेला हा व्यवस तुम्हाला दरमहिन्याला चांगली कमाई करून देऊ शकतो. जर तुम्हाला कमी खर्चात मोठा नफा मिळवायचा असेल तर ही एक उत्तम संधी आहे.

आइस क्यूब फॅक्टरी तुम्ही सतत ताबडतोडने कमाई करू शकते कारण त्याची मागणी संपूर्ण हंगामात स्थिर राहते, म्हणजे व्यवसाय मंदावण्याची शक्यता फारच कमी आहे.

Business Idea: ‘हे’ झाड लावून तूम्हीही बनाल करोडपती, कमी खर्च अन् आयुष्यासाठी लाभदायक! वाचा सविस्तर
शहरासह गावातही जोरदार डिमांड
तुम्ही आईस क्यूब किंवा ब्लॉक फॅक्टरी गावात किंवा शहरात कुठेही लावू शकता. उन्हाळ्याच्या हंगामात दुकानापासून लग्न सोहळ्यापर्यंत बर्फाची सर्वच ठिकाणी मागणी वाढते. त्यामुळे तुमच्या व्यवसायात भर होण्याची शक्यता अधिक आहे. आजच्या कळत प्रत्येक गल्लीबोळात बिनदिक्कत तुमचा व्यवसाय सुरू होऊ शकतो आणि तुम्हाला कच्च्या मालासाठी कुठेही भटकावे लागणार नाही, तर क्रिएटिव्हिटी आणि मार्केटिंगच्या जोरावर तुम्ही सहज नफा वाढवू शकता. पण हा व्यवसाय सुरू करताना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी समजून घेऊया.

फॅक्टरीची नोंदणी नक्की करा!
आपला व्यवसाय सुरु करण्याआधी तुमच्या जवळच्या प्रशासकीय कार्यालयात न विसरता नोंदणी करा. मग तुम्हाला बर्फाचा कारखाना सुरू करण्यासाठी फ्रीझरची गरज असेल. याशिवाय कारखाना चालवण्यासाठी वीज आणि बर्फ तयार करण्यासाठी शुद्ध पाण्यासह बर्फ गोठवण्यासाठी फ्रीजर आवश्यक आहे. तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये बर्फ देखील बनवू शकता, यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यास मदत होईल आणि तुमच्या उत्पादनाची मागणी वाढेल.

Business Idea: घरबसल्या कमाईची संधी, फक्त रेल्वे तिकीट विका अन् मालामाल व्हा!
आईस फॅक्टरीमध्ये कितीची गुंतवणूक
व्यवसायाच्या सुरुवातीला तुम्हाला किमान १ लाखाचा खर्च करावा लागेल. व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला डीप फ्रीझरची गरज असेल, ज्याची किंमत ५०,००० रुपयांपासून सुरू होते. याशिवाय इतर उपकरणांचीही गरज असेल. मग जसजसा तुमचा व्यवसाय वाढत जाईल तसतसे आवश्यकतेनुसार उपकरणे खरेदी करत रहा. मात्र, व्यवसाय सुरु करण्यापूर्वी काही संशोधन करणेही आवश्यक आहे. या व्यवसायाच्या मार्केटबद्दल माहिती करून घ्या, तुम्ही तुमची उत्पादने कुठून खरेदी किंवा विक्री करू शकता याबाबत सविस्तर जाणून घ्या.

टोमॅटो आणि पुदिना आइस क्युबने केलेली मसाज उजळवेल तुमच्या चेहऱ्याची कांती!

ऑनलाईन-ऑफलाईन विक्रीचा पर्याय
तुम्ही तयार केलेला बर्फ तुम्ही आईस्क्रीमची दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फळांची दुकाने आणि भाजीपाला विक्रेत्यांना विकू शकता. याबाबत तुम्हाला जवळच्या मार्केटमध्ये आपल्या फॅक्टरीची माहिती द्यावी लागेल म्हणजे आपल्या बर्फाच्या कारखान्याचा प्रचार केला पाहिजे. पोस्टर वितरित करून तुम्ही हे काम सहज करू शकता. याशिवाय तुम्ही तुमचे उत्पादन ऑनलाइनही विकू शकतात. म्हणजेच, तुमचे हे छान उत्पादन विकण्यासाठी तुमच्याकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here