मुंबई : ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सच्या व्यवसायात चांगली रिकव्हरी पाहायला मिळत असून मार्च तिमाहीत कंपनीच्या घाऊक आणि किरकोळ सेगमेंटमध्ये वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढल्यामुळे कंपनीच्या व्यवहारांची गती वाढली असून ती यापुढेही कायम राहणार आहे. कंपनीच्या प्रवासी वाहन विभागाची एकूण देशांतर्गत विक्री जानेवारी ते मार्च (तिमाही) २०२३ मध्ये वार्षिक १०% वाढली.

कंपनी ईव्ही सेगमेंटमध्ये मार्केट लीडर बनण्याच्या मार्गावर आहे. टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५०,००० इलेक्ट्रिक वाहने विक्रीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आणि त्यांच्या सर्व चार SUV म्हणजेच नेक्सन, पंच, Harrier आणि सफारीला देखील जास्त मागणी आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी कंपनीचे मजबूत फंडामेंटल लक्षात घेऊन शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

TATAचा शेअर एकदम सुसाट, थांबता थांबेना! स्टॉक रोज अप्पर सर्किटवर, चेक करा डिटेल्स
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांचे म्हणणे आहे की मार्च तिमाहीत टाटा मोटर्सचे घाऊक उत्पादन २४ टक्के (वार्षिक आधारारवर) आणि १९ टक्के (तिमाही आधारावर) ने वाढून ९४,६०० युनिट झाले. ८४,५०० युनिट असण्याचा अंदाज होता. आर्थिक वर्ष 2023 साठी घाऊक विक्री ९% वाढून सुमारे ३२१३०० युनिट्स झाली. लँड रोव्हरने (LR) ३४ टक्के (वार्षिक आधारावर) आणि २२ टक्के (तिमाही आधारावर) वाढ नोंदवली आहे. तर जग्वारचे व्हॉल्यूम २७ टक्के (वार्षिक आधारावर) आणि ३ टक्के (तिमाही आधारावर) ने घसरले.

सोशल मीडियावर शेअर मार्केटच्या टिप्स देणाऱ्यांना दणका, SEBI कडून नवी नियमावली जारी
दुसरीकडे रेंज रोव्हर आणि आरआर स्पोर्टच्या उत्पादनात सतत वाढ होत आहे. कंपनीच्या वाढत्या व्यवसायामुळे शेअर येत्या काही दिवसांत ५२५ रुपयांपर्यंतची पातळी गाठू शकतो. असे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे.

रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ५.२३ कोटी शेअर्स
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओचा टाटा मोटर्सचा प्रमुख भाग आहे. आता त्यांचा पोर्टफोलिओ त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला सांभाळत आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे ५२,२५६,००० शेअर्स म्हणजेच ५.२२ कोटी शेअर्स आहेत. त्यांची कंपनीतील एकूण भागीदारी १.५% आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here