मुंबई: पंतप्रधान यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं असून लाखो भारतीयांनी हा सोहळा आवर्जून पाहिला. भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री यांनीही प्रभू रामाला अनोखं अभिवादन केलं आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुंचल्यातून प्रभू रामाचं अप्रतिम चित्रं रेखाटून श्रीरामाला अभिवादन केलं आहे.

अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन होत असताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्या घरात सहकुटुंब प्रभू रामाच्या प्रतिमेची पूजा केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसोबत अयोध्येतील भूमिपूजन सोहळा टीव्हीवरून पाहिला. या संपूर्ण सोहळा पाहत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडताच पंकजा मुंडे यांच्या कुटुंबीयांनी एकमेकांना मिठाई भरवत हा आनंदोत्सव साजरा केला. त्याआधी काल पंकजा यांनी वॉटर कलर घेऊन कॅनव्हासवर प्रभू रामाचं अप्रतिम चित्रं साकारलं. हे चित्र साकारतानाचा व्हिडिओ त्यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच प्रभू रामाची पूजा करतानाचे फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

दरम्यान, आज दुपारी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी रामभक्तांना संबोधितही केलं. कोणतंही कार्य करताना आपण श्रीरामाकडून प्रेरणा घेतो. श्रीराम हे आपले प्रेरणास्त्रोत आहेत. राम आजही आपल्या मनात आहेत. आपल्या संस्कृतीचा आधार आहेत, असं मोदी म्हणाले. श्रीराम मंदिर आपल्या संस्कृतीचं आधुनिक प्रतिक बनेल. आपल्या शाश्वत आस्थेचं हे प्रतिक असेल. हे मंदिर कोट्यवधी लोकांच्या सामूहिक शक्तीचं प्रतिकही बनेल. हे मंदिर कित्येक पिढ्यांना साधना आणि संकल्पाची प्रेरणा देत राहील. मंदिर उभं राहिल्यानं अयोध्येची केवळ भव्यता वाढणार नाही तर अर्थतंत्रावरही परिणाम होईल. संपूर्ण जगभरातून इथे लोक प्रभू राम आणि माता सीतेच्या दर्शनासाठी येतील, असंही त्यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here