अकोला : राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक चांगली असून दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील दहा दिवसांत बाजारात १० हजार ४०३ इतकी क्विंटल तुरीची खरेदी झाली. त्यावेळी बाजारात तुरीला ८ हजार रूपयांपेक्षा अधिक दर मिळाला आहे. २९ मार्चला तुरीचा दर नऊ हजारांच्या जवळपास पोहोचला होता, म्हणजेच या दिवशी तुरीला ८ हजार ९६५ रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. परंतु, त्यानंतर एप्रिल महिन्यात तुरीचे दर खाली आले. यंदा तुरीचे पीक फुलत असताना बदलत्या वातावरणाचा फटका तुरीला बसला. तसेच विदर्भात अनेक भागात शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यामुळ तुरीच्या उत्पन्नात घट झाली आहे. असे असतांना दरवर्षीप्रमाणे यंदाही तुरीला मागणी कायम आहे, अन् आगामी दिवसांत ‘मे’ आणि ‘जून’ महिन्यात तुरीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, अशी शक्यता बाजारातील अभ्यासकांनी वर्तवली आहे.

अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मार्च महिन्यात तुरीचे दर कमी होते, म्हणजेच १५ मार्च रोजी तुरीचा भाव ६ हजार पासून ८ हजाय २८० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे होता. त्यानंतर तुरीचे दर ७५ रुपयांनी घसरल्याने आठ हजार दोनशे पाच रुपयांपर्यंत तुरीला प्रतिक्विंटल भाव मिळाला. येथून पुढे तुरीच्या दरात तेजी येत गेली अन् २० मार्च रोजी तुरीला कमीत कमी ५ हजार ५०० पासून ८ हजार ७०० रूपये इतका भाव गेला. पुन्हा इथून पाच दिवस तुरीच्या दरात घसरण झाली. २५मार्चला तुरीचे भाव ८ हजार ७०० रूपयांवर पोहोचले. २७ अन् २८ मार्च रोजी तुरीच्या दरात तेजी अन् आवक वाढली. २८ मार्चला तुरीचे दर ९ हजारांच्या जवळपास पोहचले. या दिवशी ७ हजार पासून ८ हजार ९६५ रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला भाव आला. मार्च महिन्यातील तुरीला सर्वाधिक जादा दर मिळणारा हा दिवस ठरला. इथून मार्चच्या अखेर तुरीच्या दरात सातत्याने घसरण दिसून येत गेली. २९ मार्चला तुरीचे दर १७० रुपयांनी खाली आले. त्यावेळी ७ हजार पासून ८ हजार ७९५ रूपये इतका भाव तुरीला मिळाला.

मुंबईच्या सामन्यापूर्वी धोनीचं टेंशन वाढलं, ज्याच्यासाठी सर्वांशी भांडले तोच ठरला डोकेदुखी

एप्रिल महिन्यात पहिल्याच आठवड्यात तुरीचे दर घसरले

मार्च महिन्याच्या अखेरिस शेतमालाच्या दरात नेहमीच चढ-उतार दिसून येतो. यंदाही तुरीच्या दरात काहीच वेगळं चित्र दिसून आलं. २९ मार्चच्या तुलनेत ३ एप्रिलला तुरीच्या दरात ५५ रुपयांनी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळ तुरीला ७ हजार ते ८ हजार ४५० तर सरासरी भाव ८ हजार रूपये प्रतिक्विंटल मागे आला. दुसऱ्या दिवशीही तुरीचे दर १२५ रुपयांनी कमी झाले. ५ एप्रिल रोजीचा ७ हजार पासून ८ हजार ३२५ रूपये अन् सरासरी भाव ८ हजार रूपये इतका तुरीचा भाव होता. त्यानंतर तुरीच्या दरात मोठी वाढ झाली म्हणजेच ४०५ रुपयांनी तुरीचे दर वाढले. अन् ६ हजार ४०५ ते ८ हजार ७३० रूपये प्रति क्विंटलप्रमाणे तुरीला दर मिळाले. तर सरासरी भाव ८ हजार रूपये होता. परंतु, या दरात आज शुक्रवारी ३० रुपयांनी घसरण झाली आहे, आज ८ एप्रिलला ७ हजार २०५ पासून ८ हजार ७०० तसेच सरासरी भाव ८ हजार ३०० रूपये आहे. दरम्यान तुरीच्या दरात घसरण होत असली तरी आगामी काही दिवसांतही तुरीला जास्त दर मिळण्याची शक्यता व्यापारी गटातून वर्तविली जात आहे.

आज शनिवारी अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला ८ हजार ७० ते ८ हजार ७५५ रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे तुलनेत अकोटच्या बाजारात ५५ रुपयांनी तुरीला जादा भाव होता.

अखेर तुरीच्या दराच्या वाढीचा ट्रेंड, ४०५ रुपयांची वाढ, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, तूर नऊ हजारांचा टप्पा गाठणार?

‘मे’ आणि ‘जून’ महिन्यात तुरीच्या दरात वाढ

मार्च महिन्यातील तुरीच्या दरात १५० ते २०० तसेच कधी ३० तर कधीकाळी ७० रुपयांनी चढ उतार राहू शकतात. पण एप्रिलच्या सुरुवातीपासूनच तुरीची आवक कमी राहून दरवाढ होऊ लागली. तर ‘मे’ आणि ‘जून’ महिन्यात तुरीच्या दरात आणखी तेजी येण्याचा अंदाज आहे. तुरीचे दर ९ हजार रुपयांचा टप्पा गाठू शकतात. म्हणून आता शेतकऱ्यांनी बाजाराचा समजून आपल्या तुरीच्या विक्री करावी, असंही जाणकार सांगतात.

विदर्भाच्या कापूस पंढरीतून गुड न्यूज, पांढऱ्या सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, जाणून घ्या आजचे दर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here