चंदिगड: सकाळी एक तरुण पोलीस ठाण्यात आला आणि त्याने पोलिसांनी जे सांगितलं ते ऐकून पोलीसही हैराण झाले. त्यांना काही काळ कळेना की तो तरुण खरं बोलतोय की खोटं. या तरुणाने पोलिसांना सांगितलं की त्याने त्याच्या पत्नी आणि ८ वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली.हरियाणातील सोनीपतमधील खरखोडा येथून ही हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या निष्पाप मुलाची आणि पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याचबरोबर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घरगुती त्रासाला कंटाळून तरुणाने हे पाऊल उचलल्याचे सांगितलं जात आहे. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे.

नववीत नापास झाला, गावाबाहेर जाऊन व्हिडिओ बनवला, म्हणाला – मला आता या जगात राहायचे नाही, अन्
ही धक्कादायक घटना खरखोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाळपूर गावातील आहे. गोपाळपूर येथे राहणारा समशेर पत्नी कुसुम आणि आठ वर्षांचा मुलगा इशांतसोबत गावात राहत होता. शुक्रवारी-शनिवारी मध्यरात्री पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात समशेरने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले, यात कुसुमचा जागीच मृत्यू झाला. यानंतर समशेरने त्याच्या आठ वर्षांच्या मुलाचीही हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत: सकाळी पोलीस ठाणे गाठले, पत्नी आणि मुलाची हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं.

नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी समरेशला अटक केली आणि तात्काळ समशेरच्या घरी पोहोचले. तिथे घरातील दृश्य पाहून सारेच घाबरले. घरात मुलगा आणि पत्नीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि पुरावे गोळा केले.

त्यानंतर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणाची माहिती देताना एसीपी जीत सिंह यांनी सांगितले की, तरुणाने पत्नी आणि मुलाची हत्या केली आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन आत्मसमर्पण केले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे.

बराच वेळ कोणीच घराबाहेर पडलं नाही, शेजारी पाहायला गेले, समोर हादरवणारं दृश्य; त्या रात्री नेमकं काय घडलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here