नवी दिल्ली : पहिल्यांदाच भारतीय सेनेकडून महिला सैनिकांना काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आलाय. ”च्या या महिला सैनिकांना उत्तर काश्मीरमध्ये एलओसी नजिक कुपवाडामध्ये तैनात करण्यात आलंय. उल्लेखनीय म्हणजे, एकीकडून पाकिस्तान आणि दुसरीकडून चीनसोबत तणावात वाढ झाली असताना या महिला सैनिकांना या भागात तैनात करण्यात आलंय.

आसाम रायफल्सच्या या नियंत्रण रेषेजवळ जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर लक्ष ठेवून आहेत. जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ दुर्गम भागांत पहिल्यांदाच बंदूक हातात घेतलेल्या महिला सैनिक दिसत आहेत.

वाचा :

वाचा :

उल्लेखनीय म्हणजे, या भागात सीआरपीएफची महिला वाहिनी गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहेत. भारतीय लष्कराच्या महिला सैनिकांची एक टीम एलओसी नजिक टंगडार – टीटवाल मार्ग आणि साधना टॉपवरच्या चौक्यांमध्ये तैनात आहे. काही दिवसांपूर्वी, या चौकीपासून जवळपास १५ किलोमीटर दूर उंचावरच्या भागातील चौक्यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भेट दिली होती.

वाचा :

वाचा : वाचा :

सीमेनजिक हत्यारं आणि नशेच्या पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी महिला सैनिकांचा सहभाग मोठा महत्त्वपूर्ण ठरू शकतो. गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी संघटना हत्यारांच्या आणि नशेच्या पदार्थांच्या तस्करीसाठी महिलांची मदत घेताना आढळले आहेत. या महिला सैनिक संशयित महिलांची तपासणी घेण्याचं काम कोणत्याही वादाशिवाय करू शकतील. एलओसीवर तैनात भारतीय सेनेच्या या महिला सैनिकांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० आणि कलम ३५ ए हटवून एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून हा भाग आणि लडाख असा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्यात आला होता.

काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या वर्षपूर्तीच्या अगोदरच्या दिवशी पाकिस्तानात इमरान खान सरकारकडून एक वादग्रस्त नकाशा जारी करण्यात आलाय. यामध्ये पाकिस्ताननं संपूर्ण जम्मू – काश्मीर आणि लडाखला आपला भाग दाखवत दावा केलाय. याचाच अर्थ, यापुढे पाकिस्तान हा भाग वादग्रस्त भाग मानणार नाही.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here