ठाणे : मित्राच्या वाढदिवसाच्या दारू पार्टीत झालेल्या वादात एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी ८ एप्रिल रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हत्येप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दोन भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंब्रा पोलिसांनी या दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांवर याआधीही एक गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.याबाबतची अधिक माहिती अशी की, ठाण्यातील मुंब्रा येथील ठाकूर पाडा परिसरात ८ एप्रिल रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास ७ ते ८ मित्र आपच्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त पार्टी करण्यासाठी जमले होते. मात्र यावेळी मद्यपान सुरू असताना काही मित्रांमध्ये मद्यधुंद अवस्थेत शाब्दिक वाद सुरू झाले. नंतर हे भांडण विकोपाला गेलं आणि मुद्यधुंद अवस्थेत सिद्धेश शेडगे व संकेत शेडगे या दोघा भावांनी उमेश कदम या तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला.

मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून नांदेडमध्ये विकायचे, एका प्रकरणात टीप मिळाली, पोलिसांकडून तिघांचा करेक्ट कार्यक्रम

या हल्ल्यात उमेश कदम हा तरुण गंभीर जखमी झाला. सोबत असलेल्या इतर मित्रांनी मध्यस्थी करत उमेशला जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र डॉक्टरांनी उमेशला मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी झालेल्या घटनेचा तपास केला असता सिद्धेश शेडगे व संकेत शेडगे या दोन भावंडांनी उमेशवर प्राणघातक हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पुढील तपास मुंब्रा पोलीस करत असल्याचे कळवा-मुंब्रा विभागाचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here