मुंबई: आयपीएलच्या १६व्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडियमवर मॅच सुरू आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचा फायदा चेन्नईच्या गोलंदाजांनी बरोबर घेतला. मुंबईच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी केली. या दोघांनी चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र त्यानंतर संघाचा डाव कोसळला. मुंबईने ३ षटकात विकेट न गमावता ३० धावा केल्या होत्या. चौथ्या षटकात तुषार देशपांडेने रोहित शर्माची बोल्ड घेतली. त्यानंतर सातव्या षटकात ईशान किशनला रविंद्र जडेजाने ३२ धावांवर माघारी पाठवले. ईशानच्या जागी स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव मैदानात आला. गेल्या काही दिवसांपासून खराभ फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमारकडून घरच्या मैदानावर चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.
MI vs CSK: सूर्यकुमारचे या दोन गोलंदाजांविरुद्ध भयानक रेकॉर्ड; घरच्या मैदानावर होऊ शकतो गेम चेन्नईच्या ज्या गोलंदाजापासून सूर्यकुमार यादवला सर्वाधिक धोका होता त्यानेच आठव्या षटकात त्याला बाद केले. या मॅचच्या आधी मिचेल सॅटनरने सूर्याला २ वेळा बाद केले होते. मिचेलविरुद्ध सूर्याला ५२ चेंडूत ५६ धावा करता आल्या होत्या. यावेळी देखील मिचेलने त्याला बाद केले. पण सूर्यला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचे श्रेय मिचेलला नाही तर कर्णधार धोनीला द्यावे लागले.
मुंबई-चेन्नई मॅचच्या आधी गुणतक्त्यात झाला मोठा फेरबदल; दोघांना धक्का देत हा संघ झाला अव्वल मिचेलने टाकलेला चेंडू सूर्याने स्विप करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाला नाही. धोनीने विकेटच्या मागे चेंडू पकडला आणि अपील केली. अंपायरने त्याला दाद दिली नाही. तर धोनीने क्षणाचा विलंब न करता थेट DRS घेतला. सूर्या बाद असेल याबाबत मिचेल देखील साशंक होता मात्र धोनीला खात्री होती की चेंडूचा आणि ग्लव्जचा स्पर्श झाला आहे.
टीव्ही रिप्लेमध्ये धोनीचा अंदाज खरा ठरला आणि सूर्यकुमारला पुन्हा एकदा निराश मनाने पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. त्याला २ चेंडूत फक्त १ धावा करता आली. सूर्या पाठोपाठ कॅमरून ग्रीन आणि अर्शद खान अनुक्रमे १२ आणि २ धाव करून माघारी परतले. यामुळे मुंबईची अवस्था ५ बाद ७६ अशी झाली.