अहमदनगर: राजकारण म्हणजे शहकाटशहाचा खेळ. एकाच पक्षातील नेत्यांमध्येही हा खेळ अव्याहत सुरू असतो. मग प्रतिस्पर्धी पक्षातील नेत्यांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. पण त्याला काही अपवादही असतात. राजकारणातील मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे असेच एक अनोखे उदाहरण नगरमध्ये आज पाहायला मिळाले.

शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं केवळ शिवसेनेतच नव्हे तर सर्वसामान्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत आज राठोड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अंत्यसंस्कारानंतर स्थानिक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनीही राठोड यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्याबद्दल बोलताना लंके यांना अश्रू अनावर झाले.

वाचा:

‘अनिलभैया राठोड हे आमचे सर्वांचे दैवत होते. ती एक आगळीवेगळी शक्ती होती. त्यांनी नगर जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला उभं करण्याचं, त्यांना ताकद देण्याचं काम केलं. त्यांच्या जाण्यामुळं आम्ही पोरके झाले आहोत. भैयांच्या आशीर्वादामुळंच आज मी आमदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढत असतानाही त्यांचे आशीर्वाद मला होते. नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीयांच्या, शेतकरी बांधवांच्या व जनतेच्या वतीनं मी भैयांना आदरांजली अर्पण करतो,’ अशा भावना लंके यांनी यावेळी व्यक्त केल्या.

वाचा:

राठोड यांच्या अंत्यसंस्कारासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. फुलांनी सजवलेल्या रुग्णवाहिकेतून राठोड यांचे पार्थिव अमरधाम येथे आणले होते. यावेळी ‘अमर रहे अमर रहे, अनिल भैया अमर रहे,’ अशी घोषणाबाजी शिवसैनिक करीत होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here