धुळे: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. शनिवारी धुळ्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि विजांचा कडकडाट झाला. अशातच अंगावर वीज कोसळली आणि दोन जणांना गंभीर दुखापत झाली. ही घटना धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारात सायंकाळच्या सुमारास घडली.

धुळ्यात शेतात गहू काढत असताना अंगावर वीज पडल्याने ४८ वर्षीय ज्ञानेश्वर नागराज पाटील या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर केवळबाई देवराम मोरे (पाटील) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धुळे तालुक्यात काल सायंकाळी अचानक जोरदार वारा सुरू झाला त्यानंतर शेतातील काही कामे आपटण्यासाठी गेलेले ज्ञानेश्वर पाटील यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर केवळ बाई मोरे या गंभीर जखमी झाल्या आहेत.

धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारात ज्ञानेश्वर पाटील हे आपल्या परिवारासोबत राहत होते. जुनवणे शिवारात त्यांची शेती आहे. शेतात गहू पिकाची काढणी सुरू होती. त्याठिकाणी गावातील काही जण त्यांच्या सोबत शेतात होते. सायंकाळच्या सुमारास अचानक वारा सुरू झाला. पावसाचे वातावरण तयार झाले. विजांचा कडकडाट सुरू झाला. सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळली. ही वीज ज्ञानेश्वर पाटील आणि केवळबाई देवराम मोरे (पाटील) यांच्या अंगावर कोसळली. त्यांना तातडीने जखमी अवस्थेत धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

हळदीची काढणी सुरू असताना भयंकर घटना; वीज कोसळून २५ वर्षीय तरुणाचा शेतातच मृत्यू

हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी ज्ञानेश्वर पाटील यांना तपासून मृत घोषित केले. तर केवळबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षक दामोदर नवल पाटील (वय ४३, रा. जुनवणे ता. धुळे) यांनी दिलेल्या माहितीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बीडला अवकाळी पावसानं झोडपलं, आष्टीमध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, शेतीचं मोठं नुकसान

अवकाळी पावसाने शेतामधली पिकं आडवी

राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षे, आंबा, टरबूज, संत्रा, कलिंगड, गहू, कांदा, हरभरा या पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील येडशी, शिराढोण, तडवळा, वाडी आणि बामणी या परिसरात गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या फळबागा मातीमोल झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पावसामुळे रब्बीच्या हंगामातील हाताश आलेली पिकं आडवी झाली आहेत.

पुणेकर ऐकत नाय! हापूस परवडेना म्हणून थेट आंबा EMIवर, विक्रेत्याची भन्नाट कल्पना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here