CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अयोध्येत श्री रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्याबरोबर असलेले सर्व मंत्री आणि आमदारांनी देखील रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. राम प्रभुचं दर्शनं घेतलं याचा मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. येथून ऊर्जा, प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाऊ. महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होईल यासाठी प्रयत्न करु असे शिंदे म्हणाले. 

बळीराजावरचं संकट दूर व्हावं, जनतेच्या आयुष्यात सुखाचे यावेत, हेच श्री रामाकडं मागणं

बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराचं पाहिलेलं स्वप्न देखील पूर्ण होत असल्यानं त्याचाही आनंद असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आज प्रभु रामाचं दर्शन घेतलं याचा मोठा आनंद होत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. बळीराजावरचे संकट दूर व्हावं, राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस यावेत हीच मागणी रामलल्लाच्या चरणी केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

एक स्वप्न पूर्ण झालं : देवेंद्र फडणवीस 

प्रभू रामाचं दर्शन घेऊन आनंद झाला आहे. एक स्वप्न पूर्ण झालं आहे. रामाकडं काही मागायची गरज नाही सगळं मिळत असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंदिर पूर्ण झाल्यानंतर मी परत येईलच असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

news reels Reels

CM Eknath Shinde : अयोध्येत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत, शक्तिप्रदर्शन करत रॅलीला सुरुवात   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here