चंद्रपूर: कुठली ही नशा किती घातक असते याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्हात आला आहे. दारूच्या नशेत वडिलाने आपल्या तीन वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाची हत्या केल्यानंतर या बापाने स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मूल तालुक्यातील राजोली येथे आज घडली. प्रियांशु गणेश चौधरी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. पोलिसांनी गणेश विठ्ठल चौधरी याला अटक केली आहे. या घटनेने जिल्हात खळबळ उडाली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मूल तालुक्यात येणाऱ्या राजोली येथील गणेश विठ्ठल चौधरी याला तीन वर्षांचा प्रियांशु नावाचा मुलगा आहे. गणेश याला दारूचे व्यसन होते. व्यसनामुळे घरात अधूनमधून वाद होत असत. अशातच दारू पिल्याने पती-पत्नीत वारंवार भांडणं होत असत. काही दिवसांपूर्वी पती-पत्नीत भांडण झालं होतं. गणेशने पत्नीला मारहाण केली. त्यामुळे ती माहेरी निघून गेली.

प्रेमसंबंध तोडले तर फोटो व्हायरल करेन, तरुणाची धमकी अन् १७ वर्षाच्या मुलीनं आयुष्य संपवलं, ११ दिवसांनी…
मुलगा प्रियांशु घरीच होता. रविवाररी पहाटेला झोपेत असलेल्या प्रियांशु याचा गळा दाबून गणेशने त्याची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करत आत्महत्येच्या प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमी अवस्थेत असलेल्या गणेशला उपचारासाठी मूल रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.

बाप लग्न करुन देईना, संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या बापाचा काटा काढला

दारूबंदी उठली, गुन्ह्यांच्या घटनेत वाढ झाली

चंद्रपूर जिल्ह्यात सलग पाच वर्ष दारूबंदी होती. या पाच वर्षात गुन्हाच्या घटना कमी झाल्यात. मात्र, दारूबंदी उठताच जिल्ह्यात क्राईम वाढलं आहे. दारूच्या नशेत क्राईम झालेल्या घटनांची संख्या मोठी आहे. दारुमुळे पोलीस विभागाचा ताणही वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात परत दारूबंदीची गरज असल्याचे आता बोलले जात आहे.

विवाहबाह्य संबंधांतून सुखी संसाराची माती, नवऱ्यानं बायको अन् मुलाला संपवलं, अ‍ॅसिड ओतलं अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here