कोल्हापूर : गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चैत्र यात्रेत जोतिबा डोंगरावर तब्बल ८३ चोरट्यांना पोलिसांनी पकडले आहे. दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या अंबाबाईच्या रथोत्सवातही चोरट्यांनी महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. पाकिट, सोनसाखळी, मंगळसूत्रांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या आणि पर्यटकांच्या आनंदला चोरट्यांमुळे गालबोट लागले आहे.जोतिबा चैत्र यात्रेत चोरांचा धुमाकूळ

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा लाखोंच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यात्रेसाठी तब्बल आठ लाखाहून अधिक भाविक डोंगरावर आल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक येऊनही योग्य नियोजनामुळे यात्रा शांततेत पार पडली. मात्र यामध्ये एकाचा पाय घसरून आणि एकाचा हृदय विकाराच्या झटक्याने असे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोन भाविक दगड लागल्याने जखमी झाले.
शेवटच्या क्षणी जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची कारवाईपासून वाचली, राहुल रेखावर ऑर्डर घेऊनच आले
यात्रेत गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनी भाविकांच्या खिशावर डल्ला मारला. गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या तब्बल ८३ चोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या ८३ पैकी ४७ संशयितांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत आणि ३२ संशयितांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. तर मुस्कान आणि निर्भया पथकाकडून यात्रेत हरवलेल्या ६ अल्पवयीन मुलांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. ड्रोनद्वारे संपूर्ण यात्रेवर करडी नजर ठेवण्यात आली होती.

करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव; १५०० किलो वजनाचा दुमजली रथ अन् लाखोंच्या संख्येनं भाविक

अंबाबाईच्या रथोत्सवात दोन लाखांचे दागिने लंपास

चैत्र यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी अंबाबाईचा रथोत्सव पार पडला. यालाही मोठ्या प्रमाणात भाविक अंबाबाई मंदिर परिसरात दाखल झाले होते. रस्ते अरुंद असल्याने मोठी गर्दी झाली. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तब्बल २ लाख १५ हजारांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. तीन महिलांचे दागिने चोरीला गेल्याची नोंद जुना राजवाडा पोलिसांकडे करण्यात आली आहे. तर आता पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला. एका वृद्ध महिलेच्या गळ्यातून दीड तोळ्याची सोनसाखळी गेली. अन्य एका महिलेची सोन्याची माळ तसेच तिसऱ्या एका महिलेची सुद्धा सोनसाखळी चोरांनी लंपास केली. यामुळे भाविकांच्या आनंदाला चोरट्यांमुळे गालबोट लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here