रांची: वडिलांच्या मृत्यूने दुखावलेल्या मुलाने आपली जीवन यात्रा संपवली आहे. वडिलांचा मृत्यू झाला, घरात सारे त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते. त्याचवेळी मुलाने घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आता पिता-पुत्रावर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आधी वडील आणि त्यानंतर मुलाने अशाप्रकारे आपल्या आयुष्याची अखेर केल्याने संपूर्ण कुटुंब दु:खसागरात बुडालं आहे.ही दुःखद घटना झारखंड येथील बोकारो थर्मल परिसरातील आहे. जेथे गोवर्धन राजवार यांचा काल डीव्हीसी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते काही वर्षांपासून अर्धांगवायूने त्रस्त होते. त्यांच्यावर रांची अपोलो येथे उपचार सुरू होते. नुकतेच घरी आणण्यात आलं होतं. मात्र, काल अचानक त्यांची तब्येत जास्त बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने डीव्हीसी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भांडणानंतर बायको माहेरी गेली, तो दारुच्या नशेत घरी आला, तीन वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, अन्…
मात्र, रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी आणण्यात आला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार होते. त्यासाठी घरात कुटुंबीय सारी तयारी करत होते. मात्र, तेवढ्यात पहाटे त्यांचा लहान मुलगा कुंदन कुमार (२९) याने घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आपलं आयुष्य संपवलं.

स्वप्न होतं गायक होण्याचं पण परिस्थितीमुळे बनला गोळेवाला; तरुणानं हार मानली नाही, महिन्याला भरघोस कमाई

मी आधीच म्हटलं होतं, बाबांना काही झालं तर…

घरातील सदस्य काही कामानिमित्त खोलीत गेले असता त्यांना कुंदन फासावर लटकलेला दिसला. त्याला तात्काळ खाली उतरवण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

घरातील प्रमुखाचा मृत्यू झाल्याने आधीच कुटुंबीय वेदनेत होते. त्यात तरुण मुलानेही आपलं आयुष्य संपवल्याने आता या कुटुंबावर एकाच वेळी दोघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह येताच मुक्तीधामकडे रवाना होणार आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, कुंदनने आधीच सांगितलं होतं की जर वडिलांना काही झाले तर तो देखील जीव देईल. पण, कोणाला माहिती होतं की तो खरंच असं काही करेल.

अशी गर्लफ्रेंड नको! एकाच वेळी १८ बॉयफ्रेंड, १ पती, २ कोटींची फसवणूक, पण अखेर या मॉडेलचा पर्दाफाश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here