इन्स्टाग्राम स्टोरीजवर करण जोहरची पोस्ट शेअर करताना कंगनाने टोमणा मारत लिहिलं की, ‘एक वेळ अशी होती की चाचा चौधरी मला इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे उच्चभ्रू घराणेशाहितील लोकांसोबत मिळून नॅशनल टेलिव्हिजनवर माझा अपमान करायचा. आज त्याचं हिंदी पाहून विचार आला की, आता फक्त तुझं हिंदीच सुधारलं आहे, पुढे बघ अजून काय काय होतं.’

करण जोहरने नक्की काय शेअर केलेलं?
करण जोहरने इन्स्टाग्राम स्टोरीवर कोणाचंही नाव न घेणारी एक गूढ पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने लिहिले की, ‘लगा लो इल्जाम, हम झुकने वालों में से नहीं हैं… झूठ का बन जाओ गुलाम… हम बोलनेवालों में से नहीं… जितना नीचा दिखाओगे… जितने आरोप लगाओगे… हम गिरने वालों में से नहीं… हमारा करम हमारी विजय है… आप उठा लो तलवार… हम मरनेवालों में से नहीं…।’

अनुष्का- करणच्या जुन्या व्हिडिओने सुरू झाला राडा
दरम्यान, एका कार्यक्रमातील अनुष्का शर्मा आणि करण जोहरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात अनुष्काचं करिअर संपण्याचा करणने खूप प्रयत्न केल्याचं तो स्वतः बोलताना दिसला. नेमकी यानंतर कंगनाने करणवर निशाणा साधला होता.
खासगी आयुष्याबद्दल मी कधीच काही लपवलं नाही, ‘दौलतराव’बद्दल खास फिलिंग