हाथरसः लग्नाचा मांडव सजला होता, स्टेजवर नववधू आणि नवरदेव बसले होते. तितक्यात नवरीने हातात पिस्तूल घेत हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. तर, नववधू हवेत गोळीबार करत असताना नवरदेव मात्र शांतपणे बाजूला बसलेला आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील हा व्हिडिओ आहे. चर्चेत आलेल्या या नवरीविरोधात गुन्हा दाखल झाला असून ती सध्या फरार आहे. स्वतःच्याच लग्नात गोळीबार करणाऱ्या तरुणीची ओळख पटली असून रागिणी असं तिचं नाव आहे. हाथरस येथील ती रहिवासी असून तिच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी गोळीबार केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलं आहे. अटकेच्या भितीने नवरी फरार झाली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, एक व्यक्ती नवरीच्या हातात पिस्तूल दिली. त्यानंतर स्टेजवरुनच तिने हवेत गोळीबार केला. तर तो व्यक्तीही तिथेच तिच्याबाजूला उभा होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीचाही शोध सुरु आहे. हाथरस येथील सलेमपुर येथील एका गेस्ट हाऊसमध्ये लग्न समारंभ होतो. तिथेच ही घटना घडली आहे.

वर्सोवावरुन आता समुद्रामार्गे पालघर गाठा, असा असेल संपूर्ण मार्ग, प्रवाशांचा अर्धा वेळ वाचणार
व्हायरल व्हिडिओमध्ये, काळा शर्ट घातलेल्या एका नववधुने हवेत चारवेळा गोळीबार केला. गोळीबारानंतर तिने ते पिस्तूल पुन्हा त्या व्यक्तीच्या हातात दिलं. यावेळी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या नवरी फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

लग्न लावलं, वाजत-गाजत वरात आणली, पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नववधूचं भयंकर सत्य समजलं

फेसबुक पोस्टवरुन मारहाणीआधी रोशनी शिंदेंच्या ऑफिसमध्ये राडा, व्हिडिओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here