नांदेड: नुकत्याच जन्मलेल्या मुलीला भेटून घरी परतणाऱ्या पित्याचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्रीच्या सुमारास नांदेडमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. नांदेड-अर्धापूर मार्गावरील पिंपळगाव परिसरात हा अपघात झाला. प्रवीण रामराव पवार असं अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव आहे.२५ वर्षीय प्रवीण पवार हा अर्धापूर तालुक्यातील अमराबाद तांडा येथील रहिवासी आहे. तीन वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याला दोन मुली आहेत. महिन्याभरापूर्वी त्याला दुसरी मुलगी झाली होती. तिला भेटण्यासाठी तो रविवारी वडगाव येथील सासरवाडीला गेला होता. वडिलांना पाहून दोन वर्षाची चिमुकली आनंदित झाली होती. पत्नी आणि मुलीला भेटल्यानंतर तो रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या गावाकडे जाण्यास निघाला.
गुप्तांगातून पोटात शिरला साप! वेदनेनं विव्हळत तरुण रुग्णालयात; डॉक्टर चकित अन् मग…
नांदेड अर्धापूर मार्गावरील पिंपळगाव जवळ येताच पाठीमागून आलेल्या ट्रकने त्याला चिरडले. ट्रकच्या टायर खाली आल्याने प्रवीणचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग केंद्र आणि अर्धापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रवीणचा मृतदेह अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. दरम्यान घटनेनंतर पसार झालेल्या ट्रक चालकाला अर्धापूर पोलिसांनी गस्त लावून ताब्यात घेतले. रविवारी उशिरा अर्धापूर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोटासाठी जीव गमावला लागला; समृद्धीवर चहा विकायला गेला अन् अपघात झाला, अपघातांचा रनवे

प्रवीण पवार यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. दुसरी मुलगी झाल्यानंतरही त्याचे कुटुंबीय आनंदात होते. मात्र या सुखी कुटुंबायार रविवारी काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातामुळे पत्नी आणि मुलीचा आधार हरपला आहे. सोमवारी सकाळी प्रवीणच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here