जळगाव : गल्लीमध्ये तरूणांमध्ये वाद सुरू होता. त्यातील एकाला काय झाले?, अशी विचारणा केल्यानंतर त्याचा त्याला राग आल्याने तरुणावर कोंबडी कापण्याच्या हत्याराने वार केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. धक्कादायक बाब म्हणजे याच रागातून मध्यरात्री आरोपीने त्या तरुणाची घरासमोर उभी असलेली दुचाकी देखील पेट्रोल टाकून जाळली. हत्याराने वार केल्याने आसिफ खान यासीर खान (२५, रा. पोलिस कॉलनी, सुप्रिम कॉलनी) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस कॉलनी येथील आसिफ खान हा तरुण शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उस्मानिया मशिदीमध्ये नमाज पठणासाठी जात होता. मशिदीजवळील गल्लीत त्याच्या ओळखीच्या काही तरूणांमध्ये वाद सुरू होता. त्यातील एकाला त्याने काय झाले? अशी विचारणा केली. मात्र, त्या तरूणाने त्याच्याशी वाद घालून कोंबडी कापण्याच्या हत्याराने त्याच्या हातावर वार केला. भांडण सोडवण्यासाठी आसिफ खान याचे भाऊ आणि वडील आल्यावर त्यांना सुध्दा दोन जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर याठिकाणी गर्दीतील लोकांनी भांडण सोडवून आसिफ खान याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले.

सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील बंगल्यातील अतिरिक्त बांधकामाला सीआरझेची परवानगी
मारहाणीनंतर देखील तरुणाचा राग शांत झाला नाही. मारहाण करणाऱ्या याच तरुणाने मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास आसिफ खान याची घरासमोर उभी एमएच १९ डीएस ७९६९ क्रमांकाची दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिली. रात्री आसिफ खान याच्या भावाला अचानक जाग आली तेव्हा त्याला दुचाकी जळताना दिसली. परिसरात दुचाकी जाळणाऱ्याचा शोध घेतला असता ज्यांनी आसिफला मारहाण केली होती, ते तरुण पळताना दिसून आले.

या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी आसिफ खानने एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यावरून इम्रान अजीज खाटीक, रीहान इम्रान खाटीक, रईस गुलाब पटेल आणि जुनेद गुलाब पटेल (चौघे. रा.पोलीस कॉलनी, सुप्रीम कॉलनी जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील हे करत आहेत.

मुंबई तापली! कमाल तापमान वाढतेच; पुढचे ४ दिवस अधिक उष्णतेचे, वाचा इतर जिल्ह्यांची स्थिती…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here