मध्यप्रदेशः पाण्यावर तरंगणारे बाबानंतर आता सोशल मीडियावर आणखी एक चक्रावणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नर्मदा नदीच्या पाण्यावर एख महिला चालत असल्याचे दिसत आहे. सफेद साडीतील या महिलेला लोक नर्मदा देवी समजून पुजत आहेत. ही महिला पाण्यावर चालत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर वेगळेच सत्य समोर आलं आहे.काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेला नर्मदा घाटावर पाहिलं गेलं होतं. त्या महिलेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, ती महिला पाण्यावर चालताना दिसत आहे. या व्हिडिओमुळं परिसरात मोठ्या प्रमाणात ती देवी असल्याची अफवा पसरली. लोकं तिची नर्मदा देवी म्हणून पुजा करु लागले. परिसरात या महिलेच्या नावाने अंधश्रद्धा पसरली होती. ही महिला जिथे जिथे जात होती तिथे लोकं तिचा पाठलाग करु लागले होते.

पोलिसांना या व्हायरल व्हिडिओबाबत माहिती मिळताच त्यांनी लगेचच तपास करण्यास सुरुवात केली. या महिलेचा शोध घेतल्यानंतर तिचं नाव ज्योति बाई असं असल्याचं समोर आलं आहे. ती नर्मदापुरम येथे राहणारी आहे. पोलिसांनी तिच्याविषयी माहिती मिळवल्यानंतर ती मे २०२२पासून बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. तिच्या मुलाने तिची मानसिक स्थिती ठिक नसल्याचं म्हणत आधीच पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
प्रवासी रिक्षेत बॅग विसरला; आत होतं सोने आणि पैसे, चालकाचे कृत्य पाहून तुम्हीही कौतुक कराल
पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओबाबत महिलेकडे चौकशी केली असता तिने म्हटलं की, जी जिथून चालत होती तिथे पाणी कमी होतं. त्यामुळं मी पाण्यावर चालतेय असा भास होत होता. मात्र, प्रत्यक्षात असं काही नव्हत. तो फक्त एक नजरेचा खेळ होता. तसंच, तिचे कपडे का भिजले नव्हते याबाबत विचारलं असता तिने कपडे उन्हात वाळत घातले होते त्यामुळं ते लवकर सुकले, असं तिने म्हटलं.
VIDEO: लग्नाचे विधी सुरू होते, तितक्यात नवरीने स्टेजवरुनच हवेत गोळीबार केला; अन् आता…
या घटनेची पूर्ण चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबाशी संपर्क केला. तिचा मुलगा आल्यानंतर त्याचाकडे तिचा ताबा दिला व ती त्या घरीदेखील गेली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अशा व्हायरल व्हिडिओवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे. अशा घटनांमुळं अंधविश्वास वाढतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हिंगोलीतल्या पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा अंनिसकडून पर्दाफाश, थेट डेमो दाखवून उघडं पाडलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here