मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने आजही मुंबईला अक्षरशः झोडपून काढलं आहे. पावसामुळं मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. तसंच, मरिन लाइन स्थानकाशेजारील झाड कोसळल्यानं पश्चिम रेल्वेवरील लोकलसेवाही विस्कळीत झाली आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसानं हाहाकार माजवला आहे.

मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या पावसाचा जोर दुपारनंतर वाढला आहे. दक्षिण मुंबईत सोसाट्याचा वारा सुटल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. जोराचा वारा आणि पाऊस यामुळं अनेक ठिकाणी झाड कोसळली आहेत. गेल्या १२ तासांत १५० मिमिपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर, पश्चिम द्रुतगती मार्गावरील मालाड येथे काल घडलेल्या दुर्घटनेमुळं आजही वाहतुक कोंडी झाली आहे.

वाचाः

झाडांची पडझड

मुंबईत मुसळधार पावसामुळं अनेक भागांत झाडांची पडझड झाली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा, मरीन लाइन्ससह अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, मुंबईतील डि. वाय. पाटील स्टेडियमलाही पावसाचा फटका बसला आहे. अजूनही या भागात पावसाचा जोर कायम असून जसलोक रुग्णालयाच्या इमारतीचे पत्रेही उडून गेले आहेत. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. ताडदेव, स्लेटर रोड येथील डायना पुलाजवळ पाणी साचल्याने वाहने पाण्याखाली गेली आहेत.

वाचाः

रेल्वे गाड्यांना फटका

मरीन लाइन स्थानकाजवळ रुळांशेजारी असलेले झाड दुपारी चारच्या सुमारास कोसळले. झाड कोसळल्यामुळं ओएसमधील विद्युत पुरवठा बंद करून झाड हटवण्याचे काम सुरू असून यामुळं चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान लोकल फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, वांद्र- अंधेरी येथून विरारडहाणू रोडसाठी लोकल फेऱ्या सुरु आहेत. चर्नी रोड स्टेशनवर ओव्हर हेड वायरवर झाडं आगीचा भडका उडाला. दरम्यान, मध्य आणि हार्बररेल्वेवरीलही लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. मस्जिद रेल्वेस्थानकात पाणी शिरल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ते कुर्ला ते सीएसएमटी- वडाळादरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबईसह ठाण्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने रेड अॅलर्ट जारी केला असून नागरिकांना कारण नसताना घराच्याबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here