मुंबई: मुंबईत वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पुढे काही तास जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने पोलिसांनी मुंबईकरांसाठी अॅलर्ट जारी केला आहे. ( issued alert on )

वाचा:

मुंबई पोलीस दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. घरातच राहावे, अशी विनंती मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना केली आहे. पाणी भरणारी ठिकाणे तसेच समुद्र किनारी जाणे टाळा. आवश्यकती खबरदारी बाळगा, असे आवाहन करतानाच कोणत्याही प्रकारची आपत्ती असल्यास तातडीने १०० नंबरवर कॉल करून कळवा, असेही ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. ‘टेक केअर अँड स्टे सेफ मुंबई’, असं आपुलकीचा सल्लाही मुंबई पोलिसांनी दिला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही अशाच आशयाचे ट्विट करून मुंबईकरांना खबरदारी बाळगण्याचे व कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबतच मुंबई पालिकेनेही नागरिकांना सतर्क केले असून अतिवृष्टीचे ढग दाटल्याने सर्वच यंत्रणा सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा:

पुढचे २४ तास धोक्याचे

उत्तर कोकणातील मुंबई, , आणि हे चार जिल्हे तसेच घाट परिसरासाठी पुढचे २४ तास धोक्याचे आहेत. येत्या २४ तासांत या भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पुराचा धोकाही वर्तवण्यात आला आहे. गेल्या सहा तासांत मुंबईत आधीच १०० मिमी इतका पाऊस झाला असून या पार्श्वभूमीवरच मुंबई पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.

वाचा:

पावसात अडकलेल्यांसाठी तात्पुरती व्यवस्था

मुंबई महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन नजीकच्या पालिका शाळांमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे विमानतळ परिसरात दृश्यमानता खालावली असून सहा विमानांना काही काळ आकाशात घिरट्या घालून लँडिंग करावे लागले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here