पुणे : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी टीका केली होती. प्रिया बेर्डे आणि रघुवीर खेडकर यांच्या टीकेनंतर गौतमी पाटील हिच्या बचावासाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पुढं आल्या आहेत. जसा त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे तसंच गौतमी पाटील ही सर्वसामान्य घरातून आलेली आहे. गौतमी पाटील सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी असून तिला पाठिंबा देणं गरजेचं असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या.

तृप्ती देसाई यापूर्वी देखील कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी ज्यावेळी गौतमी पाटील हिच्याविरोधात भूमिका घेतली होती त्यावेळी तिच्या पाठिंब्यासाठी पुढं आल्या होत्या. आता देखील प्रिया बेर्डे आणि रघुवीर खेडकर यांनी केलेल्या टीकेनंतर तृप्ती देसाई पुन्हा पुढं आल्या आहेत.

पिवळ्या सोन्याचे दर स्थिरावले, सोयाबीनबाबत बाजारातून नवी अपडेट, शेतकरी मोठा निर्णय घेणार?

तृप्ती देसाई काय म्हणाल्या?

“जसं त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसं गौतमी पाटील देखील सर्वसामान्य घरातून आलेली आहे. सर्वसामान्य घरातून आलेल्या गौतमी पाटीलला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या. राजकीय नेते, कीर्तनकार गौतमीला विरोध करतात तेव्हा सर्वसामान्य जनता तिच्या पाठीमागं उभी राहते, असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.

Maharashtra Weather: राज्यातील या भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार; पुढील काही दिवस असं असेल वातावरण

गौतमी पाटील कुठलिही पार्श्वभूमी नसताना गरीब घरातून आलेली आहे. महिला म्हणून तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

तृप्ती देसाई यांनी यापूर्वी गौतमी पाटील हिच्या मानधनाच्या मुद्यावरुन प्रश्न उपस्थित करणाऱ्या कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती. इंदोरीकर महाराजांना तृप्ती देसाई यांनी सुनावलं होतं. तीन गाण्याला तीन लाख रुपये दिले जातात, असं इंदोरीकर महाराज यांनी गौतमी पाटीलचं नाव न घेता म्हटलं होतं. त्यानंतर गौतमी पाटीलनं तीन गाण्याला तीन लाख रुपये घेत नसल्याचं म्हटलं होतं. याशिवाय गौतमी पाटीलनं इंदोरीकर महाराजांची चाहती असल्याचंही म्हटलं होतं.

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलेल्या टीकेचा वाद शांत होत असताना ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी गौतमी पाटीलवर पुन्हा एकदा टीका केली.

फडणवीसांच्या निकटवर्तीयाकडे कर्नाटकमध्ये खास जबाबदारी; अयोध्या यात्रेनंतर थेट मोहिमेवर रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here