नाशिक : जिल्ह्यातील साक्री-शिर्डी या महामार्गावर ट्रॅक्टर व मोटारसायकल यांची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बागलाण तालुक्यातील चौंधाने येथील भारतीय सैन्यात असलेले जवान साहेबराव सोनवणे (वय ३५) यांचं निधन झालं आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, छत्तीसगड येथे कार्यरत असलेले जवान साहेबराव सोनवणे हे तीन दिवसांपूर्वीच सुट्टी घेऊन आपल्या गावी घरी आलेले होते. सुट्टीवर असताना ते दासवेल येथे त्यांच्या मामाला भेटण्यासाठी गेले होते. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ते आपल्या मोटार सायकल क्र. एमएच ४१, एडी ७६७५ या वाहनाने परत येत असताना आव्हाटी (ता.बागलाण) येथील कांद्याने भरलेला ट्रॅक्टर सटाणा येथे जात होता. मात्र ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरने अचानक वळण घेतले. यात जवान साहेबराव सोनवणे यांची दुचाकी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली आली. यावेळी जवान साहेबराव सोनवणे हे चाकाखाली चिरडले गेल्याने गंभीर जखमी झाले.

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

यावेळी विरगाव फाटा परिसरात असलेल्या काही ग्रामस्थांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली व जखमी जवान साहेबराव सोनवणे यांना बाहेर काढून उपचारासाठी सटाणा येथे घेऊन गेले. परंतु त्यांचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती सटाणा पोसीस स्टेशन येथे कळवण्यात आली असून जवानाच्या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

दरम्यान, साहेबराव सोनवणे हे देशसेवा करत असताना सुट्टी घेऊन आपल्या घरी आलेले असताना असा दुर्दैवी प्रसंग घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here