मुंबई: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना आज सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनंतर या आंदोलकांना आझाद मैदानात नेण्यात आले. पाहुयात, राज्यात आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स…
लाइव्ह अपडेट्स…>> जेएनयू हे देश विरोधा कारवायांचं केंद्र; हिंदू रक्षा दलाचा आरोप>> हिंदू रक्षा दलाने जेएनयू हल्ल्याची जबाबदारी स्विकाराली >>मुंबई: जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय
>> ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पोलिसांनी आझाद मैदानात नेले
>> काही आंदोलक अजूनही ‘गेट वे’ येथेच असून ही जागा रिकामी करावी, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे.
>> दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे रविवारी मध्यरात्रीपासून ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times