पाटणाः अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. आता बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने परत पाठवावे, असे डीजीपी म्हणाले.

आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना बिहारला परतण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सहकार्य केले पाहिजे. त्यांना कैदी बनवून ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारला कुठलाही अधिकार नाही. मुंबई पोलिसांचे वर्तन कायद्याला धरून नाहीए. मुंबई पोलिसांच्या या गैरवर्तनाचा तीव्र निषेध करतो. विनय तिवारी हे अखिल भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी आहेत, असं बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे म्हणाले.

सुशांतसिंगच्या आत्महत्ये प्रकरणी तपासासाठी बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी हे मुंबईत आले होते. मुंबईत येताच बीएमसीने त्यांना क्वारंटाइन केले आहे.

‘सुशांत सिंह प्रकरणात रिया फरार’

पाटणा पोलिस मुंबईत पुढील तपास कसा करणार. कारण मुंबई पोलिसांच्या वाईट वर्तणुकीमुळे आमच्या ४ पोलीस अधिकाऱ्यांवर लपून बसण्याची वेळ आलीय. रिया चक्रवर्ती समोर येत नसल्याने पाटणा पोलिस तिची चौकशी कशी करणार? सुशांत सिंग प्रकरणी रिया चक्रवर्ती फरार आहे. रिया चक्रवर्ती ही मुंबई पोलिसांच्या संपर्कात असू शकते. पण पटना ती पोलिसांच्या संपर्कात नाहीत. आम्ही तिचा शोध घेत आहोत, असं डीजीपी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला या प्रकरणी तीन दिवसात सद्यस्थिती अहवाल देण्यास सांगितलं आहे. पण चौकशीच करू दिली जात नसल्याने आम्ही काय रिपोर्ट सादर करणार? मुंबई पोलिसांनी आम्हाला कामच करू दिले नाही? तरीही सुशांत सिंग राजपूत प्रकरणी काहीतरी काळंबेरं आहे, आहे हे तीन दिवसांतील तपासात चौकशीत पटना पोलिसांनी उघड केलंय. विनय तिवारी यांना सोडण्यासाठी बीएमसी आयुक्तांना पाटणाच्या आयजींनी पत्र पाठवले होते. हे पत्र बीएमसी आयुक्तांनी फेटाळून लावले आहे. म्हणजेच विनय तिवारी यांना आता क्वारंटाईनमध्ये १४ दिवस मुंबईत रहावेच लागणार आहे. आता विनय तिवारींची बीएमसीने कोरोना चाचणी केली तर त्याचा अहवालही पॉझिटिव्ह येईल असा आपल्याला संशय आहे, असं डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here