सातारा : ग्रामदैवता श्री वाघेश्वरी देवीच्या यात्रेदरम्यान महिलांसाठी आयोजित केलेल्या तमाशाच्या कार्यक्रमाचा नारळ फोडण्यावरून हासेवाडी (ता. कोरेगाव) येथे शनिवारी रात्री राडा झाला. यात यात्रा कमिटी सदस्य महेश सदाशिव घोरपडे व त्यांचा मुलगा रोहन घोरपडे यांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी परस्पर विरोधी १४ जणांवर वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या राड्यात महेश यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन व अर्धा तोळ्याचा बदाम गहाळ झाला.महेश घोरपडे यांच्या तक्रारीवरून चंद्रकांत गुलाबराव घोरपडे, सुधाकर गुलाबराव घोरपडे, भानुदास यशवंत घोरपडे, हिंदुराव आप्पासाहेब घोरपडे, विकास आप्पासाहेब घोरपडे, बबलू चंद्रकांत घोरपडे, आकाश भरत घोरपडे, सुरज शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चंद्रकांत घोरपडे यांच्या तक्रारीवरून महेश घोरपडे, रोहन घोरपडे, अतुल घोरपडे, कालिदास घोरपडे, अर्जुन घोरपडे व स्वाती घोरपडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तमाशाच्या कार्यक्रमाचा श्रीफळ हा यात्रा कमिटीने वाढवावा, असे महेश घोरपडे यांनी सुचवले होते. त्यावेळी गावातील चंद्रकांत व सुधाकर घोरपडे यांनी उपसरपंच विकास घोरपडे हे यात्रा कमिटीत असल्याने एकटेच नारळ फोडतील, असे सांगितले. यावेळी महेश घोरपडे यांनी संपूर्ण यात्रा कमिटी नारळ फोडील असे स्पष्ट केले. यानंतर दोन्ही राजकीय गटात मारामारी झाली.
तमाशाच्या कार्यक्रमाचा श्रीफळ हा यात्रा कमिटीने वाढवावा, असे महेश घोरपडे यांनी सुचवले होते. त्यावेळी गावातील चंद्रकांत व सुधाकर घोरपडे यांनी उपसरपंच विकास घोरपडे हे यात्रा कमिटीत असल्याने एकटेच नारळ फोडतील, असे सांगितले. यावेळी महेश घोरपडे यांनी संपूर्ण यात्रा कमिटी नारळ फोडील असे स्पष्ट केले. यानंतर दोन्ही राजकीय गटात मारामारी झाली.
सध्या जिल्ह्यात यात्रांचा हंगाम सुरू आहे. यात्रांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी श्रेयवादावरून, ऑर्केस्ट्रा, तमाशा सुरू असताना नाचल्यावर समजावण्यास गेल्यावर एकमेकांमध्ये वाद होत आहेत.त्याचे पर्यवसान हाणामारी करणे, गोंधळ घालणे, खून करण्यापर्यंत मजल जात आहे. त्यामुळे गावातील शांततेचा भंग होऊन गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे.
मुंबई लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, वाद मिटवणाऱ्या महिला पोलिसालाही दुखापत; व्हिडीओ व्हायरल
नुकतीच कराड तालुक्यातील गोळेश्वर गावच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या ऑर्केस्ट्रासमोर डान्स करणे व शांत बसण्यास सांगितलेच्या कारणावरून दोन गटात तुंबळ मारामारी झाली होती. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या तर दोन्ही गटातील २१ जणांवर गुन्हा दाखल केले आहेत.