नवी दिल्ली : सरकारने आगामी तिमाही म्हणजे एप्रिल-जून २०२३ साठी सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजे GPF वर व्याजदर निश्चित केले आहेत. सरकारने एप्रिल ते जून २०२३ या तिमाहीसाठी सामान्य भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर ७.१% वर कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे सलग १३व्या तिमाहीत सरकारी कर्मचार्‍यांच्या पीएफ कॉर्पसचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. वित्त मंत्रालयाने १० एप्रिल रोजी GPF बचतीवर या तिमाहीसाठी व्याजदर जाहीर केले.

GPF हे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या (पीपीएफ) जवळपास समान असून राज्य रेल्वे पीएफ सारख्या इतर सामान्य भविष्य निर्वाह निधीसाठी GPF व्याज दर देखील लागू होतात. तसेच सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांना पीएफ, संरक्षण सेवा अधिकाऱ्यांना पीएफ आणि इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचाऱ्यांना जीपीएफ मिळतो. पीपीएफमध्ये गुंतवलेले पैसे करमुक्त असतात.

SSY: सरकारी योजना देईल लाखोंचा परतावा…लग्नाच्या वयात तुमच्या मुलीला मिळेल लाखोंची शिदोरी
पीएफ खातेधारकांसाठी व्याज जाहीर
केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) अलीकडेच २०२२-२३ साठी पीएफ खातेधारकांसाठी ८.१५% व्याजदर देखील मंजूर केला होता. अशाप्रकारे सुमारे तीन वर्षांनी वाढीव व्याजदराची पीएफ खातेधारकांना भेट मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी २०२१-२२ साठी EPF खातेधारकांना ८.१०% व्याज मिळत होते.

२०१८-१९ पासून व्याजदर सातत्याने घट
जर ईपीएफवरील व्याजदरांचा कल पाहिला तर २०१८-१९ पासून त्यात सातत्याने घट नोंदवली गेली. त्यावेळी व्याजदर ८.६५% होता, जो २०२१-२२ पर्यंत ८.१% वर आला. तर केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) २०२२-२३ साठी ८.१५% व्याजदर मंजूर केला आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) २७ मार्च रोजी सुरू झालेल्या बैठकीनंतर २०२२-२३ साठी ८.१५ टक्के व्याजदर मंजूर केला.

PPF खातेदारांना मोठा झटका, व्याजदरा संदर्भात सरकारचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर
अल्प बचत योजना
पीपीएफवरील व्याज अखेर जानेवारी २०१९ मध्ये वाढले होते. एप्रिल २०२० पर्यंत यात कोणताही बदल झालेला नसून नंतर व्याजदर ७.९% वरून ७.१% पर्यंत कमी करण्यात आला होता.

लहान बचत योजना
लहान बचत योजनांच्या तीन श्रेणी आहेत – बचत ठेव, सामाजिक सुरक्षा आणि मासिक उत्पन्न योजना इत्यादी. बचत ठेवींमध्ये १ ते ३ वर्षांच्या मुदत ठेवी आणि पाच वर्षांच्या आवर्ती ठेवींचा समावेश असतो. यामध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एमएससी) आणि किसान विकास पत्र (KVP) सारख्या बचत प्रमाणपत्रांचा देखील समावेश होतो. सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), सुकन्या समृद्धी खाते आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांचा समावेश होतो. मासिक उत्पन्न योजनेमध्ये मासिक उत्पन्न खाते समाविष्ट आहे.

शिक्षक संपामुळे लेकरांचं नुकसान; शेवटी ग्रामस्थच झाले शिक्षक, पद्मश्री पोपटराव पवारांचं स्तुत्य पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here