मुंबईः मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. आज संध्याकाळपासून पावसानं मुंबईसह उपनगरात पावसानं जोर धरला आहे. पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूकीवरही झाला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं रेल्वे ठप्प झाली आहे. मस्जिद आणि भायखळ्यादरम्यान दोन रेल्वे लोकल अडकून पडल्या आहेत. या लोकलमध्ये १२० प्रवासी अडकले आहेत. या प्रवाशांच्या मदतीसाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं आहे.

मस्जिद आणि भायखळ्यादरम्यान सीएसटी-कर्जत रेल्वेत १२० प्रवासी अडकले आहेत. तर, कर्जत-सीएसएमटी लोकलमध्ये ६० प्रवासी अडकले आहेत. ही लोकल मस्जिद स्टेशनच्या ६० मीटर अलीकडे थांबली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळं कर्मचाऱ्यांचे बिकट अवस्था झाली आहे. या प्रवाशांच्या सुटकेसाठी अंधेरीतील चमू रवाना झाली असून त्यांच्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी काही प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं आहे.

वाचाः

पावसात अडकलेल्यांसाठी तात्पुरती व्यवस्था

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून फोडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली आहे.

वाचाः

रेल्वे गाड्यांना फटका

मरीन लाइन स्थानकाजवळ रुळांशेजारी असलेले झाड दुपारी चारच्या सुमारास कोसळले. झाड कोसळल्यामुळं ओएसमधील विद्युत पुरवठा बंद करून झाड हटवण्याचे काम सुरू असून यामुळं चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान लोकल फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, वांद्र- अंधेरी येथून विरारडहाणू रोडसाठी लोकल फेऱ्या सुरु आहेत. चर्नी रोड स्टेशनवर ओव्हर हेड वायरवर झाडं आगीचा भडका उडाला. दरम्यान, मध्य आणि हार्बररेल्वेवरीलही लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. मस्जिद रेल्वेस्थानकात पाणी शिरल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ते कुर्ला ते सीएसएमटी- वडाळादरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here