Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा फोन करण्यात आल्याने पोलिसांची झोप उडाली. पण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपी हा मुंबईचा असल्याचं समोर आलं आहे.

सोमवारी रात्री आरोपीने प्रथम ११२ वर फोन करून छातीत दुखत असून रुग्णवाहिका पाठवा, असे कळविले होते. त्यासाठी नियंत्रण कक्षातून १०८ ला कळवा असे सांगितले. मग त्याने दुसऱ्यांदा त्याच क्रमांकावरून फोन केला. त्यावेळी आरोपीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवणार असल्याची धमकी दिली. पाोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता.
धमकावणारा राजेश मारुती आगवणे हा वॉर्डबॉय म्हणून काम करतो. तो मुंबईतील धारावी परिसरात राहतो. त्याची पत्नी कोथरूडला खासगी ठिकाणी काम करते. तो तिला भेटायला महिन्यातून दोन वेळा येतो. सोमवारी पत्नीला भेटायला आल्यावर त्याच्या छातीत दुखत होते. त्यावेळी त्याने ११२ वर फोन करून रुग्णवाहिका पाठवा असे सांगितले. त्यानंतर त्याला १०८ वर फोन करण्यास सांगितल्यानंतर त्याने पुन्हा ११२ वर फोन करून धमकी दिली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.