मुंबईः दिवसभरात राज्यात १० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण रुग्णांची संख्या साडे चार लाखांच्या घरात पोहोचली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ( in Maharashtra)

राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असला तरी रुग्ण वाढीचा दर अद्यापही अटोक्यात आणण्यात आरोग्य प्रशासनाला यश आलं नाहीये. आज राज्यात दहा हजार ३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ६८ हजार २६५ इतकी झाल्यानं राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. तर, सध्या १ लाख ४५ हजार ९६१ अॅक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात असून ३९ हजार ३८५ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

वाचाः

राज्यात आज दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नविन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २४ लाख १३ हजार ५१० नमुन्यांपैकी ४ लाख ६८ हजार २६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४० टक्के) आले आहेत.

वाचाः

राज्यात आज ३३४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे. तर एकूण मृतांची संख्या १६ हजार ४७६ इतके झाले आहे. राज्यात ९ लाख ४३ हजार ६५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

(आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११२५ (४२), ठाणे- २३२ (४), ठाणे मनपा-२८१ (९),नवी मुंबई मनपा-२९० (४), कल्याण डोंबिवली मनपा-३७१ (२३),उल्हासनगर मनपा-३० (७), भिवंडी निजामपूर मनपा-१८ (१८) , मीरा भाईंदर मनपा-१२५ (४),पालघर-११२ (२), वसई-विरार मनपा-१८७ (६), रायगड-२८३ (१९), पनवेल मनपा-१७४ (१७), नाशिक-११९(१),नाशिक मनपा-५३५ (९), मालेगाव मनपा-५१, अहमदनगर-४२४ (३), अहमदनगर मनपा-२५०, धुळे-४, धुळे मनपा-४(२), जळगाव-३२३ (३), जळगाव मनपा-१४३ (१), नंदूरबार-१० (४), पुणे- ३६४ (१५), पुणे मनपा-१२८२ (६३), पिंपरी चिंचवड मनपा-७१४ (१४), सोलापूर-२५३ (९), सोलापूर मनपा-३८, सातारा-१९३ (३), कोल्हापूर-२६४ (१२), कोल्हापूर मनपा-१६६, सांगली-८५ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-११४ (६), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-१० (२), औरंगाबाद-१७३ (१), औरंगाबाद मनपा-१०२ (४), जालना-११(१), हिंगोली-४, परभणी-१४, परभणी मनपा-३०,लातूर-१३४(१), लातूर मनपा-१८ (२), उस्मानाबाद-१४२ (३), बीड-८९ (२) , नांदेड-१२२ (३), नांदेड मनपा-१८ (२), अकोला-२८, अकोला मनपा-४, अमरावती- २२ (१), अमरावती मनपा-२७, यवतमाळ-४६, बुलढाणा-३९, वाशिम-५७, नागपूर-१२९ (२), नागपूर मनपा-३३१ (५), वर्धा-१० (३), भंडारा- ५,गोंदिया-४६, चंद्रपूर-३८, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-३९, इतर राज्य १६ (१).

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here