नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागानं पत्रकार परिषद घेत यंदाचा मान्सून कसा असणार यासंदर्भात अंदाज वर्तवला आहे. यंदाचा मान्सून देखील सर्वसाधारण असेल, असं हवामान विभागानं सांगितलं. यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज हवामान विभागानं जारी केला आहे. यंदाचा पाऊस हा सरासरीच्या ९६ टक्के होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याशिवाय यामध्ये अंदाजापेक्षा ५ टक्के जास्त किंवा ५ टक्के कमी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाचे सचिव डॉ. एम. महोपात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डी.एम. रविचंद्रन उपस्थित होते. उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतात यंदाच्या मान्सूनचा पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात राहू शकतो, असं रविचंद्रन म्हणाले.

हवामान विभागाच्या अंदाजातील प्रमुख मुद्दे

दख्खनचे पठार, कर्नाटक आणि जम्मू काश्मीरमध्ये सरासरी इतका पाऊस होईल. हवामान विभाग मे महिन्याच्या अखेरीस नवा अंदाज जारी करेल. अलनिनो वर्षाचा प्रत्येक मान्सूनवर विपरीत परिणाम होत नाही. अलनिनोच्या काळात गेल्या काही वर्षांमध्ये ४० टक्के प्रमाणात सरासरी आणि त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. हिंदी महासागरातील स्थिती मान्सून साठी अनुकूल असल्याची माहिती महोपात्रा यांनी दिली.

सेवानिवृत्तीनंतर आले शेतीचा भन्नाट प्रयोग, मार्केटची साथ मिळाली, पुण्याच्या संभाजीराव काकडेंची लाखोंची कमाई
अलनिनोचा परिणाम जुलैच्या दुसऱ्या पंधरावड्यात जाणवण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनमध्ये ८३.५ से.मी. पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनचा पाऊस सरासरीच्या ९६ टक्के होऊ शकतो किंवा तो ८३.५ से.मी. सरासरी इतका राहू शकतो. यामध्ये पाच टक्के वाढ किंवा घट होऊ, शकते, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

पिवळ्या सोन्याचे दर स्थिरावले, सोयाबीनबाबत बाजारातून नवी अपडेट, शेतकरी मोठा निर्णय घेणार?

सलग पाचव्या वर्षी सरासरी पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं सलग पाचव्या वर्षी सरासरी इतका पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा असतो. मान्सूनवर शेतीचं गणित अवलंबून असतं, त्यामुळं शेतकरी मान्सून कसा राहणार याकडे लक्ष ठेवून असतात. भारतीय हवामान विभागानं सरासरी ९६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. तर, स्कायमेट या संस्थेनं ९४ टक्के पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

तुरीच्या दरात वाढीचा ट्रेंड सुरु, ९ हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता, ‘या’ बाजारसमितीत मिळाला सर्वाधिक दर

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here