मुंबई : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाने अदानी समूहाला जोरदार दणका दिला त्यातूनही अदानी ग्रुप अजूनही सावरण्यासाठी धडपडत आहे. २४ जानेवारी रोजी अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एकीकडे गुंतवणूकदरांनी गौतम अदानी यांच्या कंपन्यांपासून सावधानीचा पवित्रा घेतला, तर दुसरीकडे संसदेपासून सर्वसामान्यांमध्ये या अहवालाबाबत गदारोळ सुरू होता.

यादरम्यान अदानी समूहाच्या कंपन्यांमधील एलआयसीच्या (भारतीय आयुर्विमा महामंडळ) गुंतवणुकीवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, एलआयसीने अदानींवर विश्वास दाखवला आणि अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक सुरूच ठेवली. या काळात मार्च तिमाहीत सरकारी विमा कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसचे लाखो शेअर्स खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

हा घ्या हिशोब! राहुल गांधींच्या २० हजार कोटी कुठून आले? आरोपानंतर अदानी ग्रुपने जारी केला तपशील
अदानी समूहात एलआयसीचा हिस्सा वाढला
एलआयसीने मार्च तिमाहीत अदानी एंटरप्रायझेससह चार समूह कंपन्यांमधील आपला हिस्सा वाढवला असून समूहातील तीन कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी कमी केली आहे. गेल्या तिमाहीत अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सची किंमत निम्म्याहून घटली असली तरी एलआयसीने गेल्या तिमाहीत ३५७,५०० शेअर्स खरेदी केले. अशाप्रकारे, मार्च अखेरीस अदानी एंटरप्रायझेसमधील एलआयसीचा हिस्सा ४.२५% वर पोहोचला, जो डिसेंबरअखेर ४.२३ टक्के होता.

हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानींसाठी आनंदाची बातमी, बांगलादेशच्या नागरिकांना आता Adani ‘पॉवर’
इतकंच नाही तर मार्च तिमाहीत LIC ने अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅस मधील आपला हिस्सा वाढवला तर अदानी पोर्ट्स, एसीसी आणि अंबुजामधील आपली हिस्सेदारी कमी केली. नवीन शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार अदानी पोर्ट्समधील एलआयसीची हिस्सेदारी डिसेंबरच्या अखेरीस ९.१४% वरून आता ९.१२ टक्के आहे. याशिवाय अदानी ट्रान्समिशनमध्ये ३.६५ वरून ३.६८ टक्के, अदानी ग्रीनमध्ये १.२८% वरून १.३५ टक्के आणि अदानी टोटल गॅसमध्ये ५.९६ टक्क्यांवरून ६.०२ टक्क्यांपर्यंत हिस्सा वाढला असून अंबुजा सिमेंटमधील एलआयसीची हिस्सेदारी ६.३३% वरून ६.२९ टक्के आणि एसीसीमध्ये ६.४१% वरून ५.१३% वर आणली आहे.

हिंडेनबर्गचा अहवाल अन् अदानींची धडपड तरी ही व्यक्ती म्हणते, शेअर्स मल्टीबॅगर ठरू शकतात
अदानी एन्टरप्राइसेसची शेअर किंमत
जानेवारी अखेरीस अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य ३०,१२७ कोटी रुपये होते, या मुद्द्यावरून बराच गदारोळ झाला. दरम्यान अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २.८५% वाढून १,८००.१५ रुपयांवर व्यवहार करत होता, जो ४,१८९.५५ रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावरून ५७% खाली कोसळला आहे.

संसदेत अदानी प्रकरण गाजलं; विरोधी खासदारांचं संसदेच्या व्हरांड्यात बॅनर झळकवत आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here