धारशीव : तुळजापुर तालुक्यातील मोर्डा येथील सीताबाई सुरवसे, हिंमत बंडगर यांच्या द्राक्ष बागेचे गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. याच नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केली. सीताबाई सुरवसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोरच हंबरडा फोडला. बँकेचे कर्ज काढून मी बाग उभी केली होती. आता मी बँकेचे कर्ज कसे फेडू, असे म्हणत हंबरडा फोडला. त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाया पडायला लागल्या. साहेब आम्हाला मदत करा, असे म्हणत हंबरडा फोडताच आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हृदयाला पाझर फुटला.मुख्यमंत्री साहेब मदत देतील तेव्हा देतील, मी देतो १० लाख रुपये, अशी घोषणाच मुख्यमंत्र्यांच्या समोर डॉ. तानाजी सावंत यांनी केली. सीताबाई यांच्या मुलालाही ते सोबत घेवून गेले. या घोषणेमुळे सुरवसे कुटुंबाला अडचणीच्या काळात डॉ. तानाजी सावंत यांच्या रुपाने मोठा आधार मिळाला.

अवकाळीचा फटका! शेतकऱ्यांचं लाखमोलाचं पीक मातीमोल; द्राक्ष, मिरचीसह अनेक पिकं उद्ध्वस्त
धाराशिव जिल्ह्यात ८ तारखेला गारपीट झाली होती. या गारपिटीचा फटका फळबागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मोर्डा येथील सीताबाई सुरवसे यांची ४ एकर द्राक्षबाग या गारपिटीत भुईसपाट झाली आहे. विविध बँकांचे कर्ज काढून द्राक्षबाग जोपासली होती. पुढच्या दोन दिवसांत ५० रुपये दराने सुरवसे यांची द्राक्ष एक्सपोर्ट होणार होती. पण त्यापूर्वीच वरुणराजाची अवकृपा झाली. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले आणि सुरवसे कुटुंब रस्त्यावरच आले.

आभाळ फाटलं, काळीज तुटलं; हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, अवकाळी पावसाने सारं हिरावलं
जवळचे पैसे गेले, शिवाय बँकेचे देणे अंगलट आले होते. सुरवसे यांची ४० टन द्राक्ष या गारपिटीत मातीमोल झाली. खर्च केलेले १० लाख रुपये वाया गेले. नफा झाला नाही. पण नुकसान झाले, अशी अवस्था सुरवसे कुटुंबाची झाली आहे. हिंमत बंडगर यांच्या २ द्राक्षबाग गारपिटीत भुईसपाट झाली आहे. बंडगर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ४ लाखाचा खर्च या बागेसाठी केला होता. या गारपिटीत बंडगर यांची बाग आडवी झाली. लागलेली सर्व द्राक्ष मातीत गेली.

फडणवीसांच्या आदेशाने बंडखोरी करणारा पहिला मी होतो; तानाजी सावंतांच्या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ

वाडी बामणी येथील बाबासाहेब उंबरदंड यांच्या कलिंगडचे नुकसान झाले. तर शिराढोण येथील राजेंद्र अभंग यांच्या शिमला मिरचीचे नुकसान झाले होते. म्हाळंगी येथील द्राक्षबागाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here