बुलडाणा : वासनेने बरबटलेल्या नराधमाने मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात घडली आहे. १० वर्षीय चिमुकलीवर ४० वर्षीय वासनांध मामाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.वासनेच्या आहारी गेलेले काही नराधम समाजात असून अशा घटना सातत्याने घडत असतात. खामगाव शहरातही अशी लाजीरवाणी आणि तितकीच संताप आणणारी एक घटना घडली आहे. पुणे येथे कामाला असलेला एक ४० वर्षीय युवक खामगाव येथे बहिणीकडे आला होता. दरम्यान ८ एप्रिलच्या रात्री त्याने आपल्या १० वर्षीय भाचीला तोंड दाबून बाजूच्या खोलीत उचलनू नेले व तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. हे दृष्कृत्य केल्यानंतर तो पळून गेला.

हसन मुश्रीफांना मोठा धक्का, कोर्टाने अर्ज फेटाळला; आता ईडीकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
पोलिसांनी आरोपीला केली अटक

ही घटना पीडित मुलीने तिच्या आईला सांगितली. याबाबत मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी याप्रकरणी नराधम मामाविरुध्द कलम ३७६ (ए), ३७७, ३७६ (आय) सहकलम ४, ६, ८ पोक्सो अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान काल रात्री शहर पोलिसांच्या डिबी पथकाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधम आरोपीस अकोला बायपास येथून अटक केली आहे.

पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांनाच शिवीगाळ, मारहाण; हल्लेखोर पतीचा धिंगाणा
ज्या पद्धतीने दिवसेंदिवस नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहे. त्या संताप जनक म्हणावे लागतील. आणि या कीळस आणणाऱ्या घटना नात्यात घडत असल्या. तरी त्याला कुठेतरी आळा बसण्याकरिता कठोर शासन होणे तेवढेच गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here