Dhule Crime News:  धुळे शहरातील (Dhule) देवपूर भागात असलेल्या विद्या भवन महिला वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज येथील एलएलबीच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या साक्री तालुक्यातील दातर्ती गावातील एका विद्यार्थिनीने आज दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

भारती अमृत चौरे (वय 23) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ही विद्यार्थिनी साक्री तालुक्यातील दातर्ती गावातील राहणारी आहे. ती सध्या धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज येथे एलएलबीच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. या विद्यार्थिनीने दोन महिन्यापूर्वीच महिला वसतिगृहात प्रवेश घेतला होता. कालच, सोमवारी ती पुन्हा वसतिगृहात आली होती. तिच्या रूम वरील मैत्रीण ही गावाला गेली होती म्हणून ती काल पासून रूममध्ये एकटीच होती. ही संधी साधून आज भारती चौरे हिने आज सकाळच्या सुमारास हॉस्टेल मधील रूममध्ये असलेल्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली असल्याची माहिती आहे.

आज दुपारच्या सुमारास भारती चौरे हिची मैत्रीण तिला बोलवण्यासाठी रुमवर गेली. त्यावेळी तिने दरवाजा उघडलाच नाही. तिच्या मैत्रिणीला शंका आल्यामुळे तिने खिडकीमधून पाहिले तर भारती चौरे हिने दोरीच्या साह्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली होती. तिने लागलीच वसतिगृहाच्या व्यवस्थापकांना सगळा प्रकार सांगितला. यावेळी हॉस्टेलमध्ये असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

सुसाई़ड नोट सापडली…

यानंतर घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस  वसतिगृहामध्ये दाखल झाले. त्यांनी रूम तोडून आतमध्ये प्रवेश केला. खोलीमध्ये भारती चौरे हिने लिहिलेली एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये तिने ‘आई पप्पा सॉरी’ असे म्हटले होते. या सुसाईड नोटमध्ये ती खूप तणावात असल्याची माहिती मिळाली. त्यातून  तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण हॉस्टेलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  भारती चौरेंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. 

news reels reels

फोटो काढण्याच्या मोहाने घात केला; शहापुरात नदीत बुडून युवकाचा मृत्यू

नदीपात्रात फोटो काढण्याच्या मोहाने एका तरुणाचा घात केला. नदीपात्रात फोटो काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे. करण अशोक फर्डे असे या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. करण आपल्या मित्रांसह आंघोळीसाठी सोमवारी (10 एप्रिल) नदीवर गेला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

शहापूर तालुक्यातील (Shahapur) शिवनेर (Shivner) या गावातील  काही युवक आंघोळीसाठी नदीवर गेले. पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले मात्र मोबाईल कॅमेरात (Mobile Camera) फोटो काढण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने करणचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here