गोगोई यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरून विद्यापीठ हिंसाचारावरही भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी आमच्यावर आरोप करतात की, आम्ही (काँग्रेस) पाकिस्तानची भाषा बोलतो. मात्र, त्याने स्वत:लाच पाकिस्तानच्या स्तरावर आणून ठेवले आहे. मोदी हे मोहम्मद अली जीना यांच्या द्विराष्ट्रवादाकडे सरकत आहेत. ते आता भारताचे हिंदू जीना म्हणून पुढे येत आहेत, अशा शब्दात गोगोई यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
‘आम्ही हिंदू आहोत. मात्र भारताचे हिंदू राष्ट्र व्हावे असे वाटत नाही’
नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरुद्ध देशभरात सुरू असलेली आंदोलने पाहता देशातील लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचा हिंदुत्वाचा विचार नाकारला आहे असेच सिद्ध होत असल्याचे गोगोई म्हणाले. आम्ही हिंदूच आहोत, मात्र आमच्या देश हिंदू राष्ट्र झालेला आम्हाला पाहायचे नाही. विरोध करणाऱ्या लोकांमध्ये अधिकतर हिंदूच आहेत, ज्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्वाला नाकारले आहे, असे गोगोई म्हणाले.
तरुण गोगोई हे तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री होते. गेल्या अनेक दिवसांपासून गोगोई यांनी नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात भूमिका घेतली आहे. त्या पू्र्वी त्यांनी देशात स्थानबद्धता केंद्रे नसल्याचे जाहीर करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. पंतप्रधान मोदी हे खोटारडे असून केंद्रातील भाजप सरकारने आसाममध्ये ग्वालपाडा येथे स्थानबद्धता केंद्र स्थापन करण्यासाठी गेल्या वर्षी ४६ कोची रुपये वितरित केले होते, असा घणाघातही गोगोई यांनी केला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times