साताऱ्यातील गॅरेजमध्ये पाणी मारताना तरुण कामगाराचा मृत्यू झाला. तरुण दीड तास पडून होता. मात्र त्याच्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही. वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली.

 

youth found dead
सातारा: समर्थ मंदिर येथील खान ऑटो गॅरेजमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा इलेक्ट्रिक शॉक लागून जागीच मृत्यू झाला. योगेश उर्फ राहुल बबन वागदंडे (वय ३५, रा. मंगळवार पेठ, चिपळूणकर बागेशेजारी सातारा) असे मृत्यमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना दीड तासानंतर नागरिकांच्या लक्षात आली. तोपर्यंत राहुलचा मृतदेह गॅरजमध्ये पडून होता.सातारा शहरातील समर्थ मंदिर चौकातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या खान ऑटो गॅरेज दुकानात कामगाराचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला. राहुल बबन वागदंडे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर राहुल दीड तास तसाच मृतावस्थेत पडला होता. त्याच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नव्हते. हा परिसर तसा नेहमीच गजबजलेला असतो. पण रात्रीची वेळ असल्याने लोक आपापल्या मार्गाने घाईने घरी जात होते. ही घटना घडली त्यावेळी कोणताही आरडाओरड न झाल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले असावे असा नागरिकांचा कयास आहे. कामगाराचा मृत्यू झाल्याची बाब लक्षात येताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
कार रोखून बॉडीचा अंगठा घेतला, संपत्ती नावावर; नातवाला वेगळाच संशय; ‘तो’ दावा केस फिरवणार?
समर्थ चौकात खान ऑटो गॅरेज नावाचे दुकान आहे. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राहुल वायदंडे स्वच्छता करण्यासाठी पाणी मारत असताना अचानक त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. जोराचा धक्का बसल्याने वायदंडे जागीच कोसळला. ही घटना सुमारे दीड तासानंतर नागरिकांना कळाली. घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती नागरिकांनी शाहूपुरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सासू सासरे रक्ताच्या थारोळ्यात, बॉडी पाहून सुनेची किंकाळी; मागच्या दारानं गूढ उकललं
रात्री उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोस्टमार्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here