मुंबई: व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री यांनी तातडीने आढावा घेतला असून मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या आहेत.

वाचा:

मुंबईत मंगळवारपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील, असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. , , रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.

वाचा:

पुढचे २४ तास धोक्याचे

उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर हे चार जिल्हे तसेच घाट परिसरासाठी पुढचे २४ तास धोक्याचे आहेत. येत्या २४ तासांत या भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पुराचा धोकाही वर्तवण्यात आला आहे. गेल्या सहा तासांत मुंबईत आधीच १०० मिमी इतका पाऊस झाला असून या पार्श्वभूमीवरच मुंबई पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी केले मुंबईकरांना सतर्क

मुंबई पोलीस दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. घरातच राहावे, अशी विनंती मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना केली आहे. पाणी भरणारी ठिकाणे तसेच समुद्र किनारी जाणे टाळा. आवश्यकती खबरदारी बाळगा, असे आवाहन करतानाच कोणत्याही प्रकारची आपत्ती असल्यास तातडीने १०० नंबरवर कॉल करून कळवा, असेही ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. ‘टेक केअर अँड स्टे सेफ मुंबई’, असं आपुलकीचा सल्लाही मुंबई पोलिसांनी दिला आहे.

वाचा:

कोल्हापूरसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना

परिसरात दिवसभरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन दलाच्या ( NDRF ) दोन तुकड्या कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. कोल्हापूरमधील पावसाची स्थिती लक्षात घेऊन राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूरला पाठविण्याबाबत मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी देखील कोल्हापूरसाठी तत्काळ तुकड्या रवाना करण्याचे निर्देश दिल्याचे राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here