मुंबईः मस्जिद आणि भायखळ्यादरम्यान अडकलेल्या दोन लोकलमधून प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि पोलीसही ‘एनडीआरएफ’टीमच्या मदतीनं लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. या दोन्ही लोकलमध्ये २९० प्रवासी अडकले होते.

मुंबईत दोन दिवसांपासून जोर धरलेल्या पावसानं आज संध्याकाळी रौद्र रुप धारण केलं आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई लोकलला या पावसाचा फटका बसला आहे. मस्जिद आणि भायखळ्यादरम्यान दोन रेल्वे लोकल अडकून पडल्या आहेत. सीएसएमटीहून कर्जतच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमधील २५१ प्रवाशी तर टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधील ३९ प्रवाश्यांना बाहेर काढण्यात आलं असून एकूण २९० प्रवाश्यांना रेस्क्यू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं आहे. रेस्क्यू केलेल्या प्रवाशांना मुंबई महापालिकेकडून जवळच्या महापालिका शाळांमध्ये तात्पुरती राहण्याची सोय केली आहे.

वाचाः

रेल्वे रुळांवर जवळपास तीन फुट पाणी साचल्यानं कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट झाली होती. लोकलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या ४५ जणांचे एक चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

वाचाः

रेल्वे गाड्यांना फटका

मरीन लाइन स्थानकाजवळ रुळांशेजारी असलेले झाड दुपारी चारच्या सुमारास कोसळले. झाड कोसळल्यामुळं ओएसमधील विद्युत पुरवठा बंद करून झाड हटवण्याचे काम सुरू होते. यामुळं चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान लोकल फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, वांद्र- अंधेरी येथून विरारडहाणू रोडसाठी लोकल फेऱ्या सुरु होत्या. चर्नी रोड स्टेशनवर ओव्हर हेड वायरवर झाडं आगीचा भडका उडाला. दरम्यान, मध्य आणि हार्बररेल्वेवरीलही लोकल वाहतूक विस्कळीत झाली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here