वाचा:
करोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. ठाणे शहरात कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्ज लावू नये. त्याऐवजी कोविड योद्ध्यांना आणि गोरगरीब जनतेला लाभदायक उपक्रम राबवा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. त्यांनी स्वत:ही समाजभान जपत आपल्या वाढदिवशी प्लाझ्मादान केले. त्यानंतर त्यांनी विशेष आवाहनही केलं.
वाचा:
करोनातून मुक्त झालेल्या प्रत्येक माणसाने प्लाझ्मादान केले तर महाराष्ट्र करोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळेच आपण हे दान केले आहे. इतरांनीही हे दान करावे. तसेच आनंद परांजपे यांनी करोनावर मात केली आहे व त्यांनी देखील आज प्लाझ्मादान केले आहे. आता इतर करोनाग्रस्तांना बरे करण्याची जबाबदारी आपली आहे. करोनामुक्त झालेल्या सर्वच रुग्णांना प्लाझ्मादान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांची आतापर्यंत करोनाशी गाठ पडली आहे. जितेंद्र आव्हाड, , आणि अस्लम शेख या चारही मंत्र्यांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. या चार मंत्र्यांमध्ये सर्वात आधी आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. आव्हाड यांनी वेळीच उपचार घेऊन करोनाला मात दिली. त्यानंतर आता प्लाझ्मादानातही आव्हाड सर्वात पहिला नंबर लावून चांगला संदेश सर्वांसाठी दिला आहे.
वाचा:
एकावेळी १०० जणांचे प्लाझ्मा साठवणे शक्य
ठाणे शहरातील ब्लड लाइन या रक्तपेढीला प्लाझ्मा स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे. ठाणे-मुंबईमध्ये सहा ठिकाणीच प्लाझ्मा संकलन करण्यात येत होते. मुंबईमध्ये चार आणि नवी मुंबई, नालासोपाऱ्यात प्रत्येकी एका ठिकाणी हे संकलन करण्यात येत होते. परिणामी, वाहतुकीच्या समस्येमुळे ठाण्यातील रुग्णांना त्याचा लाभ घेणे जिकिरीचे होत होते. मात्र, आता ही समस्या निकाली निघाली आहे. ब्लड लाइन या रक्तपेढीमध्ये एकावेळी तीन जणांचे प्लाझ्मा संकलन करणे शक्य होणार असून किमान १०० जणांचे प्लाझ्मा साठवणे शक्य होणार आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
A big thank you for your article.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.