या पात्रता प्रस्तावात रिंग रोडच्या कामासाठी १५ हजार कोटी रुपये अपेक्षित खर्च धरण्यात आला असून त्यानुसार त्याचे पूर्व-पश्चिम अशा भागांत आठ टप्प्यांत विभाजन करण्यात आले आहे. यापैकी पश्चिम रिंग रोडमध्ये बोगदे आणि इतर भौगोलिक कारणांमुळे येथील कामांसाठी रस्त्यांची लांबी कमी गृहित धरण्यात आली आहे. पूर्व रिंग रोडमध्ये चार टप्प्यांतच करण्याचे प्राथमिक नियोजन एमएसआरडीसीने केले आहे.
असा असेल रिंग रोड
– पुण्याचा रिंग रोड पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत विभाजन
– पुरंदर, भोर, मावळ, मुळशी, खेड या पाच तालुक्यांमधून रिंग रोड जातो.
– सुमारे १५ हजार कोटी रुपये बांधकामासाठी तसेच १२ हजार कोटी रुपये भूसंपादनासाठी लागणार आहेत.
– रिंग रोडच्या ३१ किलोमीटरच्या टप्प्याचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत (एनएचएआय) केले जाणार.
– हा ३१ किलोमीटरचा टप्पा प्रस्तावित पुणे-औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉरचा एक भाग आहे.
दृष्टिक्षेपात प्रकल्प
रिंगरोडची एकूण लांबी – १३६.८० किलोमीटर
एकूण खर्च – १५ हजार कोटी
चार टप्प्यांचे काम – पूर्व रिंगरोड
पाच टप्प्यांचे काम – पश्चिम रिंगरोड
२०२४ संपेपर्यंत भारतातील रस्त्यांचं जाळं अमेरिकेपेक्षाही चांगलं असेल, नितीन गडकरींचा विश्वास
पुण्याचा रिंग रोड, मुंबईतील मल्टिमॉडेल कॉरिडॉर तसेच जालना-नांदेड महामार्ग अशा तीन प्रकल्पांसाठी सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदापूर्व पात्रता प्रस्तावांसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागातील दळणवळण सुधारण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होणार आहे.
– राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, रस्ते विकास महामंडळ