karha wagaj baramati, तमाशाला नारळ वाढवण्याचा मान, तब्बल सव्वा लाखाची बोली अन् शिट्ट्या; अख्ख्या बारामतीत चर्चा – honor of raising coconut for tamasha man bid one lakh twenty five thousand rupees in karha wagaj baramati
बारामती, पुणे :तमाशा म्हंटला की प्रत्येकाच्या अंगात उत्साह संचारतो. तमाशा ही प्रसिद्ध लोककला असून त्याची क्रेझ ज्येष्ठ व्यक्तींपासून तरुणांपर्यंत अजूनही आहे. यासाठी अनेक ठिकाणी बोली लावली जाते. मात्र बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज येथील एका व्यक्तीने तमाशाला नारळ वाढवण्याचा मान मिळवण्यासाठी तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची बोली लावली आहे. या सव्वा लाखाच्या बोलीची सध्या चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज येथे ग्राम दैवत भैरवनाथा ची वार्षिक यात्रा असते. या यात्रेत लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते. तमाशाला नारळ वाढविण्याचा मान मिळवण्यासाठी लिलावाची प्रथा आहे. यावेळी गावातील राजेंद्र भाऊ यांनी तब्बल १ लाख २५ रुपयांची बोली लावत रात्री तमशाला नारळ वाढविण्याचा मान मिळवला. तर दिवसा होणाऱ्या तमाशाचा नारळ वाढविण्यासाठी नवनाथ वायाळ यांनी तब्बल ५५ रुपयांची बोली लावली. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बोली लागल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. करोनामुळे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून तमाशा बंद होता. त्यामुळे अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांना दोन वेळचे अन्न मिळणे महाग झाले होते. मात्र यंदाच्या वर्षी अनेक ठिकाणी अनेक गावात यात्रांना चांगली गर्दी होत आहे. त्यामुळे तमाशा कलावंतांना सुगीचे दिवस आले आहेत. अनेक ठिकाणी चांगली बोली लावून तमाशे केले जात आहेत.