सिंधुदुर्ग :मालवण तालुक्यातील मठबुद्रुक लिंग्रसवाडी येथील एका तरुणाने बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. चंद्रशेखर भालचंद्र मुळ्ये (वय ३६) असं सदर तरुणाचे नाव आहे. चंद्रशेखर मुळ्ये याचा मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आणि बुधवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले.याबाबतची अधिक माहिती अशी की, लग्न होत नसल्याने चंद्रशेखर याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याबाबतची खबर त्याचे वडील भालचंद्र रघुनाथ मुळ्ये यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे.

सत्यपाल महाराजांकडून चुलीवरच्या बाबाची पोलखोल, सेम टू सेम कृती;लोकहो बाबा-बुवांना भुलू नका

चंद्रशेखर हा तसा गावात मनमिळाऊ स्वभावाचा म्हणून ओळखला जात होता. मात्र अलीकडे तो व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याच्यासोबत असलेल्या अनेक जणांचे लग्न जमले, तसंच घरातील भावंडांचीही लग्न झाली होती. परंतु चंद्रशेखर याचे लग्न जमत नसल्याने तो सातत्याने चिडचिड करू लागला होता. आपलं लग्न करून द्या, असा तगादा त्याने कुटुंबियांकडे लावला होता. मोलमजुरी करून आपले पोट भरणाऱ्या चंद्रशेखर लग्न होत नसल्याने घरच्यांना आपण आत्महत्या करणार असे धमकावत असे. मात्र त्याची वारंवार समजूत घालून कुटुंबीय देखील थकले होते. तसंच त्याच्या लग्नाचे प्रयत्न सुरू होते.

इतरांचे लग्न झाले, मात्र आपलं लग्न होत नाही, त्यात वय निघून चालले आहे, परिणामी आपले केव्हाच लग्न होणार नाही, अशा मानसिकतेमुळे तो व्यसनाच्या आहारी गेला असल्याचे स्थानिक सांगतात. या नैराश्यातून काल त्याने आपल्या घराच्या मागच्या बाजूला स्वतःवर बंदुकीने गोळी झाडून घेतली. या घटनेत त्याचा जबडा तुटला असल्याचे दिसून येत आहे. बंदूक उभी धरून त्याच्यावर आपले हनवटी ठेवून नंतर गोळी झाडली असावी, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, याबाबतचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here